कारंजा -दिनांक 11मार्च 2024रोजी कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथे प्रधानमंत्री कौशल विकास संकल्प योजना अंतर्गत ब्युटी पार्लर व विणकामचे महीलाकरिता मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन युवा नेते, भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष ज्ञायकभाऊ पाटणी यांच्या शुभ हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद यवतमाळचे भाजपा जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे होते. या कार्यक्रमात ज्ञायकभाऊ पाटणी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,मतदार संघात कोट्यावधी रुपयांचे भूमिपूजन सुरू आहे. ग्रामीण भागात काही कार्यक्रमानिमित्त गेलो असता भागवत सप्ताह 80 टक्के महिलांचा सहभाग आहे त्या अग्रस्थानी असतात महिलांमुळे देशातील संस्कृती टिकून राहली आहे. ग्रामीण भागातील दारूबंदी मागणी महिलांकडून होत असल्याचे पहावयास मिळत आहे. देशभरात मोदींनी महिलांकरिता अनेक योजना आणल्यात. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होत आहे. शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे शिक्षणाचे महत्व वाढले आहे आपल्या देशातील अर्थव्यवस्था मजबूत होत आहे जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था राहील यात महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा महिला शिक्षित असणे जरुरी आहे. केंद्र मार्फत अनेक योजना येतआहे घरापर्यंत नळ पोचविण्याचे काम मोदींनी केले. या गावात जलजीवन योजना आमदार राजेंद्र पाटणी यांनी आणली .येथे जलजीवन मिशन योजना सुरू आहे. महिलांना अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण मिळत आहे. आपणास कोणावर निर्भर राहावे लागणार नाही.प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा. काजळेश्वर येथे बचत गटासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांनी तीस लाखाचे भवन मंजूर केले आहेअसे त्यांनी सांगीतले .
या कार्यक्रमास उपस्थित यवतमाळ जिल्हा अध्यक्ष भाजपा महादेवराव सुपारे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही कार्यक्रमात सर्वप्रथम महिलांना अभिवादन करण्याचे मोदींनी आपणास सांगितले . महिलांनी आपल्या मोबाईल मध्ये नमो ॲप डाऊनलोड करावी त्यात सर्व योजनांची माहिती आहे. देशातील मोठमोठ्या पदांवर आज महिला आहे. सामर्थ्याने काम करीत आहे. बोलताना त्यांनी सांगितले की, मोदीजी जात-पात न पाहता देश सांभाळत आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. काळे यांनी सांगितले की, या गावातील पुरुषांनी आपल्या कमाईचा भाग किंवा रक्कम ही आपल्या कुटुंबाला घ्यावी. जेणेकरून आपण मेहनतीने कमावलेले पैसे कायम राहतील आणि त्यात वाढ होईल हे तुम्ही निश्चित समजा. हा पैसा जर पुरुषाकडे असला असला तर तो एखादी निवडणूक लढवून गमावून बसेल असे त्यांनी हसत हसत उपस्थित पुरुषांची फिरकी घेत सांगितले तसेच या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे सांगितले. प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक या अभियाना
च्या व्यवस्थापक तृष्णा ठाकरे मॅडम, तालुका व्यवस्थापक आरती अघम मॅडम यांनी केले. यांनी कार्यक्रमाची, प्रशिक्षण वर्गाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील कानकीरड, भाजपा तालुका उपध्यक्ष राजीव भेंडे,सौ रेखाताई लांडे,भाजपा तालुका उपाध्यक्ष संकेत नाखले, तालुका सरचिटणीस ,पंचायत समिती समिती सदस्य दीनेश वाडेकर, राठोड मंगेश धाणे, रामाभाऊ बंड , कृष्णा गावंडे ,संदीप पखाले , निखिल उपाध्ये गौरव नांदे, दिगंबर लांडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दिलिपभाऊ गावंडे यानी केले. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.