ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापूर येथे नवयुवा गणेश मंडळ उदापूर यांच्या गणेशोत्सव काल्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्रम्हपुरी तालुक्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशेत्सव संपल्यानंतर सुरू होतो तो पितॄपक्ष. विदर्भात पितॄपक्षात हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जातो.
आजही ब्रम्हपुरी तालुक्यात उदापूर गावात हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती उत्सव साजरा करण्यात येते. दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी या गणेशोत्वाच्या गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमप्रसंगी माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून गोपालकालाच्या सोहळा पार पडला.
यावेळी सोनू नाकतोडे सरपंच उदापूर, योगेश तूपट उपसरपंच, विजय नाकतोडे, शालूताई तोंडरे ग्रा.पं. सदस्या, नानाभाऊ नाकतोडे, वैशालीताई ठाकरे ग्रा.पं. सदस्या, नाकतोडे ताई ग्रा.पं. सदस्या, गजानन मिसार, हेमंत नाकतोडे, गोविंदा कोरडे, पिंटू घोरमोडे, राकेश दुनेदार, किशोर गोटे, राजेश नाकतोडे, किसन तोंडरे, शंकर भानारकर, दिनेश तूपट, दीपक तूपट, लक्षण नाकतोडे, आकाश बावणे, नितेश नाकतोडे, संगम खरकाटे, रतन बावणे, मिलिंद कोवे, राकेश दोनाडकर, रोशन गरफडे, आसिद माटे, मोहित नाकतोडे, कैलास नाकतोडे, अविनाश बावणे, महेश बावणे यांच्यासह यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
नवयुवा गणेश मंडळ उदापूर यांच्या वतीने गणेशोत्वाच्या १० दिवसात लहान मुलांच्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उदापूर गावातील लहान मुलांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.
या सर्व स्पर्धकांना गणेशोत्वाच्या गोपालकाल्याच्या कार्यक्रमप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी बक्षीस देऊन त्यांच्या कलागुणांचा सन्मान केला व प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवा गणेश मंडळ उदापूर च्या सर्व सदस्यांनी सहयोग केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....