(ईको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रम,दोन माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन,उन्हाळी शिबिराचे आयोजन)
कारंजा तालुका प्रतिनिधि- शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ग्राम यावार्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात ५ जून ते ११ जून या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नो प्लास्टिक व अक्षय ऊर्जा स्त्रोतवर प्रा. प्राविन बोनके व चैतन्य स्वर्गे या दोन माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
या शिबिरा मध्ये दिनांक 11 जून रोजी शिबिराची सुरुवात प्रभात फेरी काढून करण्यात आली त्यानंतर प्रा.प्रवीण बोनके याने नो प्लास्टिक या विषयावर बोलताना प्लास्टिक वापरण्याचे दुष्परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन तर 9 जून रोजी चैतन्य स्वर्गे याने अक्षय उर्जा स्त्रोत या विषयावर बोलताना सौर ऊर्जा,पवन उर्जा याचा वापर जास्तीत जास्त कसा करावा?या अनुषंगाने पर्यावरण जनजागृती केली.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम यावर्डी येथील प्रा प्रवीण बोनके व चैतन्य स्वर्गे तर प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे संचालक देविदास काळबांडे शिक्षक गोपाल काकड,अनिल हजारे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी वर्ग 8,9,10 विच्या उपस्थित विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.