चंद्रपूर- जवाहर नवोदय विद्यालय साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील 80 विद्यार्थी पात्र ठरले. यात विहान अजय मुसळे याने जिल्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सिंदेवाही तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी पात्र ठरले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत सिंदेवाहिच्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या एक ने वाढली आहे. वरोरा तालुक्याची मोठी घसरण या निकालात दिसून आली मागच्या वर्षी 10 विद्यार्थी पात्र केलेला हा तालुका या वर्षी फक्त तीन विद्यार्थी पात्र करू शकला. तर सावली तालुक्यातील 8 विद्यार्थी पात्र ठरले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट झालेला आहे.
केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली होती. जिह्यातील एकमेव तळोधी (बाळापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी ही परीक्षा होती.
यासाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले, परीक्षेच्या निकालानंतर 80 विद्यार्थी पात्र ठरले , या प्रवेशासाठी प्रचंड चुरस असते. परीक्षेतून भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अश्या तीन स्तरावर विद्याथ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते.
यात चंद्रपूर तालुक्यातील 06, भद्रावती 01, वरोरा 03, चिमूर 07, नागभीड 05, ब्रह्मपुरी 09, सिंदेवाही 15, मुल 04, सावली 08, गोंडपीपरी 09, राजुरा 05, कोरपना 01, बल्लारपूर 01, पोंभुर्णा 03 आणि जिवती येथून 03 विद्यार्थ्यांची निवड झाली. मागील वर्षी सिंदेवाही तालुक्यातील चौदा विद्यार्थ्यांची निवड झाली होती ती वाढून आता पंधरा वर आली हा तालुका अव्वल ठरला, विशेष बाब म्हणजे सावली आणि चंद्रपूर तालुक्याने मुसंडी मारली असून मागच्या वर्षी सावलीचे चार विद्यार्थी पात्र ठरलेला हा तालुका या वर्षी आठ विद्यार्थी तर चंद्रपूर तालुक्याचे मागच्या वर्षी दोन विद्यार्थी पात्र ठरले होते या वर्षी हा आकडा वाढून सहा वर गेलेला आहे सोबतच चिमूर, मुल, राजुरा तालुक्यातील निवड पात्र विद्यार्थी पण वाढलेले आहे म्हणून हे तालुके कौतुकास पात्र ठरले.
कोरपना,भद्रावती,बल्लारपूर, या तालुक्यातून प्रत्येकी एक विद्यार्थी पात्र ठरल्यामुळे या तालुक्यावर विशेष मेहनत करण्याची गरज आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....