कारंजा (लाड) : सर्वत्र चर्चेत असणाऱ्या प्रतिष्ठेच्या प्रशिक पतसंस्थेच्या निवडणुकीत साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे मेघन जुमळे आणि गुलाबरावजी सारोटे यांनी विकास पॅनल कडून बहुमताने दणदणीत विजय प्राप्त केल्या बद्दल करंजमहात्म्य परिवार आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक संजय कडोळे यांच्या मार्गदशनावरून , स्थानिक मॉ जीजामाता चौक कारंजा येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये अखिल भारतिय नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर,शिवसेना शिंदे गटाचे नेता ॲड.संदेश जिंतुरकर,माजी नगरसेवक प्रसन्नाभाऊ पळसकर,श्री भिला माता संस्थानचे अध्यक्ष देवमन मोरे, जिजामाता मित्र मंडळाचे चंदुभाऊ खोना, धिरज जुमळे, ज्येष्ठ विचारवंत तथा करंजमहात्म्यचे परिवाराचे संजय कडोळे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम फटाक्याची आतिशबाजी करून, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आऊसाहेब, महामानव डॉ. आंबेडकर यांचा जयजयकार करून प्रशिक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचे शाही स्वागत करण्यात आले.त्यानंतर मेघन जुमळे व गुलाबराव साटोटे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. संत गजानन महाराज मंदिरचे सेवाधारी गजानन पाटील कडू, मिंटू सागानी,साहेबराव पापडे,विजय खंडार,पत्रकार विनोद गणवीर, सुनिल गुंठेवार,किरण सावके, सुधिर वर, गुरुदेव पतसंस्थेचे राजेश चंदन, प्रदिप वानखडे, गिरीष जिचकार, गजानन चव्हाण, रोहीत महाजन आदींची उल्लेखनिय उपस्थिती होती.