ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार, तथा ने. हि. महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. विजय मुळे यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला शंकरराव मुडे (वय 86 वर्ष) यांचे वृद्धापकाळाने आज दि. 12 एप्रिल 2022 मंगळवारला सायंकाळी 5 वाजता दु: खद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा बुधवारला दुपारी 11.30 वाजता त्यांच्या गोपालनगर (तुकूम), चंद्रपूर येथील निवासस्थानाहून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने मुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.