कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):-कारंजा तालुक्याच्या सर्वच ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामिण भागात सर्वदूरपर्यत पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन ग्रामीण भागातील शेतकरी राजाचे प्रचंड नुकसान झालेले प्रथम दर्शनी स्पष्टपणे दिसून येत असून,मागील पाच दिवसापासून मुसळधार,ढगफुटीसदृष्य पाऊस होऊन मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे.त्यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शेतातील विहिरी खचल्या असून पशुधनाचेही नुकसान झाल्याचे दिसून येते तसेच अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने घरांची पडझड झाली आहे.त्यामुळे याची दखल अत्यंत तातडीने कारंजा येथील तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी घेऊन,अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्याचा प्रयत्न केला.व शक्य तेवढ्या प्रत्येक गावखेड्यावर जाऊन,शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून,पूरपरिस्थितीची,त्यांच्या शेतजमीनीच्या नुकसानीची पाहणी केली.आणि शेतकरी व ग्रामस्थांचे अश्रू पुसून त्यांना धिर देण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या ह्या तत्परतेचे,कार्यकुशलतेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तहसिलदार कुणाल झाल्टे यांच्या कार्यप्रणालीला खरोखर मानाचा मुजरा करावा.असी त्यांची कामाची पद्धती आहे अशा शब्दात महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचे कौतुक केले असून तहसिलदार कुणाल झाल्टे यांचे अभिनंदन केले आहे.आपल्या अधिनिस्त कारंजा तालुक्यातील सदर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणेबाबत त्यांनी आपल्या मंडल अधिकारी आणि तलाठी यांना देऊन शिघ्रतेने पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.असे वृत्त आमचे प्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.