अकोला : प्रतिनिधी दि. 8 फेब्रुवारी २०२४ स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय अकोलाचे सहाय्यक प्राध्यापक व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे यांना संगीत विषयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे आचार्य पदवी घोषित झाली आहे* . वर्ष २०१९ पासून प्रा.कोरडे पं.विष्णू नारायण भातखंडे कृत हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या काफी थाटातील निवडक बंदिशींचे चिकित्सक अध्ययन ) संदर्भ - क्रमिक पुस्तक मालिका भाग १ ते ६)या विषयावर डॉ.किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनात अमरावती विद्यापीठात संशोधन करीत होते . *दि.30 जानेवारी २०२४ रोजी श्री शिवाजी महाविद्यालय अकोलाच्या संशोधन केंद्रात प्रा.विशाल कोरडे यांचा ओपन डिफेन्स व्हायवा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे नेमून दिलेल्या परीक्षकांच्या समोर संपन्न झाला. परीक्षक म्हणून बार्शी ,जिल्हा सोलापूर येथील सुप्रसिद्ध कलाकार डॉ.अबोली सुलाखे , श्री शिवाजी कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट , डॉ. दीपक कोचे व डॉ.किशोर देशमुख यांनी परीक्षण केले*.प्रा.कोरडे यांनी आपल्या संशोधन विषयावर लिहिलेल्या ३०७ पृष्ठाच्या संशोधन प्रबंधावर सविस्तर पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशन केले . उपस्थित शोधार्थी प्राध्यापक वर्ग व परीक्षक यांनी विचारलेल्या प्रश्नावर गायनासह उत्तरे देऊन आपली परीक्षा पूर्ण केली . *परीक्षक डॉ.अबोली सुलाखे यांनी प्रा.विशाल कोरडे यांनी संगीत क्षेत्रासाठी केलेल्या भरीव संशोधनाचे कौतुक करून प्रा.विशाल कोरडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे आचार्य पदवी देण्यात यावी असे घोषित केले* . डॉ.किशोर देशमुख व डॉ. दीपक कोचे यांनीही प्रा. कोरडे यांचे संशोधन सामाजिक , राष्ट्रीय व संगीत क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले . *प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांनी प्रा.कोरडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून केलेल्या संशोधन कार्याचा गौरव केला*. *या परीक्षणानंतर लगेचच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे नोटिफिकेशन काढून प्रा.विशाल कोरडे यांना आचार्य पदवी मिळाली असे घोषित करण्यात आले . २४ फेब्रुवारी २०२४ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या पदवीदान समारंभात ही पदवी प्रा.विशाल कोरडे यांना बहाल करण्यात येईल* . *आपल्या अंधत्वावर मात करून प्रा.कोरडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे पहिले अंध आचार्य पदवीधारक म्हणून बहुमान प्राप्त केला आहे* . आपल्या यशाचे श्रेय प्रा.कोरडे आपली आई सौ.माधुरी कोरडे ,वडील श्री.विजय कोरडे ,बंधू श्रीकांत कोरडे ,बहीण सौ.सुवर्णा शेळके ,*मार्गदर्शक डॉ.किशोर देशमुख , संशोधन प्रबंध लिखाणासाठी वाचक-लेखनिक म्हणून कार्य करणारी विद्यार्थिनी अनामिका देशपांडे ,मित्र सचिन शिरसाट व कुटुंबीयांना देतात* . संशोधन कार्यात वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डॉ. शिरीष कडू ,डॉ.हर्षवर्धन मानकर ,डॉ.सोपान वतारे ,डॉ. राजीव बोरकर ,डॉ.उमेश घोडेस्वार ,डॉ.संजय पोहरे ,डॉ.स्नेहल शेंबेकर व प्रा.देवेंद्र देशमुख यांचेही प्रा.कोरडे आभार व्यक्त करतात . प्रा.कोरडे यांना मिळालेल्या या यशाबाबत अकोला जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.प्रदीप सुसतकर ,खासदार संजय धोत्रे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे अध्यक्ष श्री.हर्षवर्धन देशमुख , कविवर्य विठ्ठल वाघ कृषीकीर्तनकार श्री.महादेवराव भुईभार ,श्री.प्रशांत देशमुख ,प्राचार्य डॉ.अंबादास कुलट ,प्रबंधक श्री.अशोक चंदन डॉ.आशिष राऊत,जागृती विद्यालय अकोला चे मुख्याध्यापक अरुण राऊत ,पतंजली योगपीठ हरिद्वारच्या भारती शेंडे ,समाजसेवी ॲड. मोतीसिंग मोहता ,ॲड.संतोष भोरे ,दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे डॉ.संजय तिडके ,प्रा.अरविंद देव ,विशाल भोजने ,नीता वायकोळे ,डॉ.अर्चना मोरे ,डॉ.मयुरी जाधव ,डॉ.बाबुराव नवले ,अस्मिता मिश्रा ,विजयकुमार वनवे व श्वेता धावडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत . अकोल्यातील संगीत ,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातूनही प्रा.विशाल कोरडे यांचे कौतुक करण्यात येत आहे .