हिन्दुस्थान असा देश आहे की, ज्या देशामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचे निस्वार्थ बंधूप्रेम, भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची निःस्वार्थ मैत्री, सत्यवान सावित्रीचे, श्रीराम सितेचे, भगवान शंकर सतीचे पती पत्नी प्रेम, छत्रपती शिवराय आणि विर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांची (राजावरील प्रेम) स्वामी निष्ठा, झाशीची महाराणी लक्ष्मीबाई, मेवाडचा सम्राट महाराणा प्रताप, पंजाबचे देशभक्त भगतसिंग यांच्या देशभक्ती व बलिदान याच्या कथा सांगीतल्या जातात. आजही भारतिय जवानांच्या देशभक्तीला संपूर्ण जगात कोठेही तोड नाही. शोले चित्रपटामधील जय विरूची मैत्री सुद्धा एक आदर्श देवून जाते.यांचा आदर्श घेवून माणसाने माणुसकीची जाण ठेवीत मैत्री ही टिकवीली पाहीजे. आयुष्यात बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत ठिकठिकाणी समाजव्यवस्थेत काहीना काही निमित्ताने ओळख नसलेल्या व्यक्तिंसोबत एकमेकांशी परिचय होतो. बालपणी बालकमंदिर - कॉन्व्हेन्ट, पुढे शाळा महाविद्यालये, पुढे रोजगाराची विविध क्षेत्र यामध्ये माणसं एकमेकांशी जुळतात. भेटी गाठी वाढतात. पुढे एकमेकांवर विश्वास ठेवून आपण विविध कार्यक्रम मग ते कौटूंबिक असो किंवा सामाजिक. त्यानिमित्त वारंवार भेटत जातो. आजकाल विज्ञान युगातील मोबाईलचे व्हॉटस्ऍप ग्रुप, फेसबुक ग्रुप, विविध संघटना, परिषद, संमेलने याद्वारे एकमेकांशी जुळतो. परंतु एकदा जर माणूस एकमेकांशी जुळला तर त्याने एकमेकांचा आदर केला पाहीजे. एकमेकांवर विश्वास ठेवला पाहीजे. एकमेकांना आधार दिला पाहीजे. मैत्रीमध्ये राजकारण करणे अयोग्य आहे. एकमेकांचे महत्व लक्षात घेऊन एकमेकांशी सहानुभूती, प्रामाणिकता, माणूसकी व विश्वासाने वागले पाहीजे. तरच ती मैत्री टिकते. कुणीही स्वतःचा मोठेपणा मिरवीत "मी"पणाचा अहंकार करून इतर कुणाला कमी लेखत असेल. आपल्या दबावाखाली-आपल्या वर्चस्वाखाली वागविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे. केव्हा केव्हा मैत्रीमध्ये इतर व्यक्तिला स्वतःचे वर्चस्व गाजवून आपल्या दबावाखाली ठेवण्याचा जेव्हा प्रयत्न होते तेव्हा माणूसकीला काळीमा फासल्या जावून स्वस्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असतो. व ही गोष्ट मैत्रीला घातक ठरते. मग एकमेकांचे मित्र एकमेकांचे शत्रू होतात. एकमेकांची निंदानालस्ती, टिकाटिप्पणी ,चुगलखोरी करीत स्वतःचा अहंकार मिरवीत गावभर ढिंढोरे पिटवीत असतात आणि असे प्रकार समाज व्यवस्थेकरीता, गावाकरीता, राज्याकरीता, देशाकरीता, लोकशाही करीता निश्चितच घातक ठरत असतात. यामुळे खरेतर पुढे अशा घातक व्यक्तिंची त्यांच्याच अहंकारी स्वभावामुळे कुप्रसिद्धी होऊन अहंकारी, गर्विष्ठ, घमेंडी अशा टोपण नावांनी त्यांना समाजात ओळखले जाते. अशा स्वभावाच्या माणसांमुळे मैत्री, सलोखा, एकात्मता, संघटनेला तडा जावून मैत्री टिकून रहात नाही. अहंकारी माणसाचा स्वभाव समाजाला, लोकशाहीला घातक ठरतो. म्हणून समोरच्या व्यक्तीचा विनाकारण राग, द्वेश, हेवा, स्पर्धा, वादविवाद न करता स्वतःची चूक स्वतः समजून घेऊन माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहीजे. कुणाची विनाकारण बदनामी करणारी माणस समाजात वितुष्ट पसरवित असतात. अखेर ती स्वतःच बदनाम होऊन जातात. त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्याकडे समाजातील इतर व्यक्ती तर सोडाच पण त्यांच्या स्वतःची कुटूंबातील कुणीही त्यांना चांगला व्यक्ती म्हणून संबोधीत नाही. मित्रांनो तुमच्या कायमच लक्षात असू द्या "मैत्रीमध्ये मैत्रीचा विश्वासघात करणारी अहंकारी व्यक्ती भविष्यात आपले जीवन निरामय-सुखमय जीवन जगूच शकत नाही." तेव्हा प्रत्येक मित्राने निदान आपल्या देशातील आदर्श महापुरुषांचे जीवन चरित्र, आपल्या देशांची आदर्श परंपरा आणि तुमच्याच आई वडील गुरुजनांची शिकवण लक्षात घेऊन एक सच्चा साथी, अच्छा मित्र आणि माणुसकीने जगणारा चारित्र्यवान व्यक्ती म्हणून जीवन जगले पाहिजे. आपल्यावर विश्वास ठेवणार्या मित्राचा विश्वासघात न करता, एकतर्फी गैरसमज करून, वैरभाव न ठेवता नि:स्वार्थ व आदर्श मैत्री केली पाहीजे. कारण जगात मैत्रीसारखे दुसरे कोणते नाते नाही. मैत्री सारखे दुसरे कोणते नाते नाही. मैत्री सारखे दुसरे कोणते प्रेम नाही. मैत्री सारखा दुसरा धर्म नाही. मैत्री सारखा दुसरा कोणता विश्वास नाही.समाजव्यवस्था टिकविण्यासाठी समाजात निःस्वार्थ मैत्रीची गरज आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मैत्रीचे नाते आजिवन निभाऊन आपले संपूर्ण जीवन मैत्रीपूर्ण जगले पाहीजे. असे प्रबोधन विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....