धनादेश अनादरन प्रकरणी सतत शिक्षा ठोठावल्या जात असताना मा. 3 रे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी साहेब, अकोला यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. तक्रारदार मनीष वामनराव थोटांगे रा. पोळा चौक, जुने शहर, अकोला यांनी आरोपी प्रदीप देविदास वानखडे रा.पोळा चौक, जुने शहर, अकोला यांना रु.600000 हातउसने दिले होते. तसेच सदर रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने रु.400000/- रकमेचा धनादेश तक्रार कर्त्याला दिला होता. सदर धनादेश अनादरीत झाल्यामुळे तक्रारदार मनीष वामनराव थोटांगे यांनी आरोपी विरुद्ध धनादेश अनादरन प्रकरण पराकम्य अभिलेख अधिनियम च्या कलम 138 नुसार तक्रार एस. सी. सी. क्रमांक
28/2023 फौजदारी न्यायालय, अकोला येथे दाखल केली. तसेच सदर तक्रारीतील तथ्य तक्रारदार गुण व दोषाच्या पलीकडे जाऊन आरोपी विरुद्ध सिद्ध करू शकला नाही. तसेच आरोपीच्या वकिलांनी सदर तक्रार ही खोट्या तथ्याच्या आधारावर दाखल केलेली असून सदर तक्रारमध्ये वाजवी शंका निर्माण करून सदर शंकेचा लाभ आरोपीला देऊन विद्यमान न्यायालयाने आरोपीची दिनांक 4 जुलै 2024 रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे अधिवक्ता ज्ञानेश्वर सुखदेव पहारे यांनी आरोपीचा बचाव करून युक्तिवाद केला.