वाशिम : सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस अँड रिसर्च, अमरावती येथे दिनांक १० मे २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेश सोमानी (पत्रकार व समाजसेवक,वाशिम) आणि श्याम सवाई (अध्यक्ष, सर्वधर्म मित्र मंडळ, कारंजा लाड) होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संजय पाटील सर होते.
प्रास्ताविक प्रा.सोनू खंडारे मॅडम यांनी करताना नर्सिंग व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले व फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या कार्याची माहिती दिली.
निलेश सोमानी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक केले. श्याम सवाई यांनी "परिचारिका म्हणजेच देवरूपी सेविका" असे सांगत कोरोना काळातील त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संजय पाटील यांनी संस्थेची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करत सांगितले की, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थिनीला दरवर्षी मोफत शिक्षण दिले जाते.
कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षक, समन्वयक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शिपायांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये प्रा. सोनू खंडारे, सुलक्षणा चांभारे, कैलास साबळे, संतोष उसरे, आचल फुलझले, नेहा चांभारे, वर्षा भेंड आणि गणेश भेंडे यांचा समावेश होता.
१०० टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गायन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपले बहुआयामी कला गुण सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एस.एन.ए. अॅडव्हायजर निकिता कविटकर, स्नेहल गिरी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले.
---
आपल्या प्रतिक्रिया द्या....