घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरांनी घरात घुसून सोने व नगद असा २ लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. मौलाना आझाद वॉर्डातील ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
घरमालक डाखोरे हे बाहेरगावी गेले असल्याचे हेरून अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची पोत, अंगठी, कानातले डुल असे साडेचार तोळे सोने व पाच हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. डाखोरे परिवार परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेले तर साहित्य अस्ताव्यस्त व कपाटामध्ये ठेवलेले दागिने दिसले नाही. पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे यांनी अज्ञात आरोपीचा तपास सरु केला आहे.