कारंजा : पावसाळ्याच्या दिवसात, पिण्याच्या पाण्याचा साठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,नदी,विहीरी, बोअरवेल,धरण,पाझर तलाव यामध्ये पावसाचे नविन पाणी येत असते.सदर पाणी शरिरास लवकर मानवत नाही. त्यामुळे तब्येत बिघडू शकते.तसेच सदर पाणी दुषीत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी पिण्याकरीता वापरतांना उकळून थंड केलेले पाणी पिण्यास घ्यावे. पाण्यामध्ये जिवनड्रॉपचे थेंब टाकून पाणी शुद्ध करून घ्यावे. प्रवासाला बाहेर जातांना आपले घरचीच शुध्द पाण्याची बॉटल किंवा कॅन सोबत ठेवावी. प्रवासात बाहेरचे ठिकठिकाणचे पाणी पिल्यामुळे आजार बळावत असतात.हे कायमच लक्षात ठेवावे. तसेच बाजारातील,हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे उघड्यावरचे खाद्य पदार्थ, तेलकट,आंबट पदार्थ खाऊ नये.त्याऐवजी घरात शिजवलेलेच अन्न घ्यावे.डास, मच्छरा पासून शरिराचे संरक्षण करावे.पावसाळ्यात अतिसार म्हणजेच हगवण,ताप,मलेरिया, टायफाईड, डेंग्यू असे निरनिराळे आजार डोके वर काढण्याची शक्यता असते.त्यामुळे एखाद्या आजाराची शक्यता वाटल्यास दुखणे अंगावर न काढता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आवश्यकता वाटल्यास आपल्या रक्ताची चाचणी करून घ्यावी.असे सतर्कतेचे आवाहन कारंजा येथील समर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आमिर खान डॉ.मुजफ्फर खान यांनी केले आहे.