1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा गायवळ या शाळेने सहभाग नोंदवून तालुक्यात अहवाल येण्याचा मान मिळवला. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे सहशालेय उपक्रम व अभ्यासपूरक उपक्रम या विविध घटकांचे 100 गुणांची मूल्यांकन करण्यात आले .यामध्ये शाळा परिसरांची रंगरंगोटी .विद्यार्थ्याकडून निर्माण करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य .शिक्षणाशी संबंधित बोलक्या भिंती ,यासोबतच परसबाग, स्वच्छता मॉनिटर ,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी, प्लास्टिक मुक्ती, तंबाखूमुक्ती ,अभ्यासपूरक विविध सहशालेय उपक्रमाचे शाळा स्तरावर आयोजन ,राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, या सर्व घटकासाठी आवश्यक असणारा लोकसहभाग या सर्व बाबीचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत येवले, सहाय्यक शिक्षक दिनेश गाडगे ,शंकर धनकर ,श्रीकांत सावके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र व्यवहारे, सरपंच सतिष पाटील राऊत , शाळा समिती सर्व सदस्य, ग्राम पंचायत सर्व सदस्य ,यांचे मोलाचे योगदान लाभले ,यासोबतच पालक वर्ग गावकरी मंडळी आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या। आजी-माजी विद्यार्थ्यांनी भरभरून सहकार्य केले. यासाठी श्रमदान ,लोकवर्गणी ,यासारख्या उपक्रमात हिररीने सहभाग नोंदविला आणि शाळेसाठीच बक्षीस खेचून आणले