कारंजा : येथील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे, लोककलावंत प्रदिप वानखडे,देविदास नांदेकर,विजय पाटील खंडार,उमेश अनासाने यांनी नुकतीच अकोला येथील विश्व हिंदु परिषद धर्माचार्य विभागाचे विभागीय प्रमुख हभप तुळशीदास महाराज मसने ( आळंदीकर ) यांची सदिच्छा भेट घेतली.हभप मसने महाराज यांनी हिंदु धर्म रक्षण व गोपालनाचा विडा उचललेला असून,अकोला ते पळसो बढे मार्गावर सांगळूद रेल्वे गेटजवळ, यावलखेड शिवारात त्यांचे मधुवत्सल गोसेवा बहुउद्देशिय प्रतिष्ठान ही गोरक्षण संस्था सुद्धा आहे.शिवाय ते उत्कृष्ट भागवताचार्य, किर्तनकार, प्रवचनकार म्हणूनही ओळखले जातात.लहान बालकांना ते वारकरी प्रशिक्षण सुद्धा देत असतात.
तसेच गोमुत्र आणि गोशेणा पासुन विविध आयुर्वेदिक उत्पादने,अगरबत्ती इत्यादी वस्तुंचे प्रशिक्षण सुध्दा देतात.या भेटी दरम्यान त्यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या मानवसेवी कार्याची माहिती जाणून घेत आध्यात्म्य व लोककलेचा वारसा जपण्या विषयी सखोल मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या .