कारंजा : "एकमेकांशी कोणतेही वादविवाद किंवा भांडण तंटा नाही. एकमेकात कोणतीच स्पर्धा किंवा चढाओढही नाही. आणि तरीही एखादी व्यक्ती हेतुपुरस्परपणे दुसऱ्यांविषयी आपल्या व्हॉटसप ग्रुपवर विनाकारण टिकाटिपणी करीत असेल तर अशा व्यक्तिला तुम्ही काय म्हणणार ? आणि असा तंटा की ज्याला पाया किंवा मुळं नाहीत हा कोणत्या कोर्टात सोडविणार ?" असा प्रश्न मला पडलेला असल्याचे संजय कडोळे यांनी सांगीतले असून अशा टिकाटिप्पणीने काहीही कारण नसतांना चांगले संबध वाईट होत असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्वकतृत्वाने स्वतःची प्रतिष्ठा तयार करीत असतो . त्यामुळे कारण नसतांना एकमेकाची इर्षा किंवा द्वेष करणे योग्य नसून प्रत्येक माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे माणुसकीने वागले पाहीजे. इतरांकडे लक्ष्य न देता केवळ स्वकतृत्वावर लक्ष्य देऊन स्वतःचे कार्य केले पाहीजे. दुसऱ्याची बदनामी करणाऱ्याला कदाचित वाटत असेल आपण खूप चांगले काम करीत आहो मात्र या अशा कारणानी तो दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःचे महत्व कमी करून घेत असतो. त्यामुळे यापुढे तरी एकमेकांविषयी आकस किंवा वैरभाव न ठेवता सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न व्हावा. व व्हॉट्सप ग्रुपवरील फालतू टिका टिप्पणी टाळावी.हीच अपेक्षा असल्याचे संजय कडोळे यांनी म्हटले आहे.