कारंजा : आपल्या अचूक अंदाजाकरीता,केवळ वाशिम जिल्ह्याच्या पंचक्रोशितच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविण्यात पात्र ठरलेले हवामानतज्ञ गोपाल गावंडे यांनी आपला अंदाज व्यक्त करतांना, दि.19 ऑगष्ट 2023 ते दि.31 2023 पर्यंत पाऊस पडणार असल्याचे दुरध्वनीवरून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी संवाद करतांना सांगीतले असून, या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातच भाग बदलवून पाऊस होणार असल्याचे कळवीतांना दि. 21 ऑगष्ट 2023 नंतर पूर्व विदर्भातील नागपूर,वर्धा,चंद्रपूर भंडारा,गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार तर पश्चिम विदर्भात काही ठिकाणी हलका तर वाशिम यवतमाळ येथे काही तालुक्यात रिमझिम तर काही भागात मात्र विजेच्या लखलखाटासह ढगाच्या गडगडात जोरदार पाऊस होऊ शकतो असे सांगीतले असून हा पाऊस पिकांना नवसंजिवनी देऊन,सोयाबीन पिकासाठी वरदान ठरणार असल्याचे म्हटले आहे.यासंदर्भात आपल्या प्रसिद्धी पत्रकात आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी,यंदा सुमारे दोन महिन्यापूर्वी उन्हाळ्यात,शासनाच्या वेधशाळेसह अनेकांनी अल निनोच्या भितीमुळे कोरड्या दुष्काळाचेच अंदाज व्यक्त केलेले होते.परंतु ते सर्व चुकिचे अंदाज होते.मात्र "चालू वर्षात हवामानाचे गाढे अभ्यासक गोपाल गावंडे यांचे 2023 मध्ये कोरडा दुष्काळ पडणार नसून,चांगला शेतकर्याच्या पिकांना पोषक पाऊस पडणार असून,नद्या-नाले भरभरून चांगलाच पाऊस पडणार असून,शेतकरी व ग्रामस्थांनी पावसाबाबत चुकीचे अंदाज करू नये.यंदा दुष्काळ नसून भरभरून पाऊस पडून, कोणतीही दुष्काळाची परिस्थितीच उद्भवणार नसल्याचे, व चोहीकडचे हिरवे रान सुजलाम् सुफलाम् चैतन्य व उत्साहाने वातावरण राहणार असून स्थानिक पर्यावरणामुळे पाऊस उत्तमच होणार असल्याचे स्पष्ट केले होते."