तालुक्यातील शिवनी येथील वयोवृद्ध शेतकरी रामचंद्र मातेरे वय ७९ हे शिवनी आरमोरी रोडवरुण शेतजमीन सवै नंबर ३०४ बट्टे १ अदरील शेतीत उन्हाळी धान पिक घेण्यासाठी शेतातील कजरा उचलण्याचे काम करीत असताना दुपारी २ च्या सुमारास मागेऊण रानडुक्करानी अचानक हल्ला करुन उजव्या पायासहीत अनेक कबरेला गंभिर जखमी केल्याने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती गभिर जखमी झालेल्याचा मुलगा पंढरी मातेरे यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना दिली असता याची दखल घेऊन आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन वैद्यकीय उपचारासाठी मदत केली व वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले यांना माहिती देताच त्यांनी लगेच आरमोरी वनरक्षक पोशेटी पाटील यांना पाढऊन पंचनामे केले व जेकाही आपणाला शासनाकडून मदत देता येईल ते तातडीने देण्याचे काम करु असे आश्वासन दिलीप घोडाम व कृटुबियाना दिले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम आरमोरी वनरक्षक पोशेटी पाटील यशवंतराव खरकाटे पंढरी मातेरे मोहीत मातेरे प्रमोद दवै उपस्थित होते.