चिमूर पिंपळनेरी येथील राजूरकर परिवारातील लग्न आटोपून स्वगावाकडे कारने परत जात असताना चिमूर भिसी उमरेड मार्गावरील उमरी फाट्याजवळ चारचाकी वाहनाचा डावा टायर फुटल्याने वाहन उलटले. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. ही घटना सोमवारी घडली.
सत्यभामा बाळकृष्ण झिलपे (७५), टायर फुटल्याने याच कारमुळे महिलेचा मृत्यू झाला. रा. कुही असे मृतक महिलेचे नाव आहे. पिंपळनेरी
येथील राजूरकर परिवाराचे लग्न चिमूर येथील मिलन लॉनमध्ये होते. लग्न आटोपून झिलपे कुटुंब कारने (एमएच ४० सीएच ३४४६) कुहीकडे जात पिंपळनेरीसमोरील उमरी फाट्याजवळ असताना कारचा डावा टायरफुटल्याने कार उलटली. यात सत्यभामा बाळकृष्ण झिलपे या महिलेचा मृत्यू झाला असून सुनीता भोजराज झिलपे (४८) व भोजराज बाळकृष्ण झिलपे (५२) हे जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे.
करण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलिस तपास करीत आहेत. या मार्गावर काही महिण्यांपासून सतत अपघात होत आहेत. यामध्येकाहींचा बळी गेला. त्यामुळे पोलिसांनी अपघाताला आळा घालण्याची मागणी होत आहे