अकोला -- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ज्ञानार्जन करीत प्रगतीच्या भावी शिखराकडे जातांना यशाचे अनेक उंबरठे नेत्रदिपक गुणवत्तेने पार करावेत.परंतू याचसोबत शिस्त, सामाजिक नीतिमुल्ये आणि नैतिकता तथा आदर्शांचे वास्तव धडे घ्यावेत.त्यातून सकारात्मक दृष्टीकोणाने आत्मबळ वाढवत उन्नत जीवनाच्या मार्गाने प्रवास करावा.असे प्रतिपादन गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभात उपस्थित अतिथींनी केले.अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ,देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख समाज महिला मंडळाच्या वतीने दहावी,बारावी आणि स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी प्रेरक विचार व्यक्त केले.

स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवन मध्ये देशमुख मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री विश्वासराव बाप्पू देशमुख या़ंचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ७० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन आणि यशाच्या कौतुकासह गौरव करून त्यांना भावी नेत्रदिपक यशासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.निर्माण ग्रूपचे संस्थापक - अध्यक्ष श्री गणेशराव देशमुख यांनी सुध्दा याप्रसंगी सदिच्छा भेट दिली.यावेळी कॉंग्रेस नेते व जन अभियान फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अविनाशजी देशमुख,अस्थिरोग तज्ञ , ओम् मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्री.रणजित देशमुख,प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी .देशमुख समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री.के.व्ही देशमुख यांनी मंडळाचे उपक्रम आणि गुणवंतांच्या गौरव समारंभामागील उद्देश प्रास्ताविकातून स्पष्ट केला.

याप्रसंगी व्यासपीठावर अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर, उपाध्यक्ष ,ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.के व्ही देशमुख सर डोंगरगावकर,देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.राजश्री देशमुख,जागृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.श्री.संजय देशमुख,कामरगावकर,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जागृती मंडळाचे अध्यक्ष श्री संजय कृ.देशमुख,कंझारेकर देशमुख समाजसेवा मंडळाचे सचिव श्री अश्विन देशमुख,जागृती सचिव श्री नितीन देशमुख,प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला वसंतराव देशमुख देशमुख मंडळाचे माजी अध्यक्ष श्री के.एम.देशमुख, के.एम.देशमुख नायगावकर,पत्रकार विठ्ठलराव देशमुख,मंडळातील माजी पदाधिकारी,वसंतराव देशमुख ,नारखेडकर, सौ.प्रतिभा देशमुख,सौ.लता देशमुख,सर्व महिला ग्रूप लीडर्स,सौ.नयना देशमुख,स्वप्नाली देशमुख, महिला मंडळाच्या डॉ.अस्मिता देशमुख,सौ.माधुरी देशमुख,शामराव देशमुख,विठ्ठलराव देशमुख,हिवरखेडकर,सुजयबाप्पू देशमुख,विजयराव देशमुख,नितीन देशमुख,राजाभाऊ देशमुख कवठळकर,राजाभाऊ देशमुख,रिधोरेकर,संजय कमल अशोक देशमुख,डॉ.नरेन्द्र पवार,शरद देशमुख,हरिष देशमुख,डी.आर.देशमुख,अनिल वानखडे,अंकूश तवर, मुकेश देशमुख,संदिप देशमुख, शरदराव देशमुख, डॉ.महल्ले,विनय देशमुख,विनोदराव देशमुख,(भेंडी)महेश देशमुख,(सातगाव),प्रविण देशमुख( तांदळी),नरेन्द्र देशमुख,शरद देशमुख त्याचप्रमाणे तिन्ही मंडळाचे ईतर पदाधिकारी समाजबांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सौ.संजीवनी देशमुख तर आभारप्रदर्शन श्री राजाभाऊ देशमुख कवठळकर यांनी केले.
वृत्त्त संकलन तथा शब्दांकन:- संजय देशमुख
आपल्या प्रतिक्रिया द्या....