वाशिम :-
स्वतंत्र भारतात सध्या प्रचंड महागाई, बेरोजगारी, शेतकर्याच्या समस्या आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तळागाळातील सर्व सामान्य नागरिक हे प्रचंड वैतागले आहेत. त्यामुळे सर्वत्र विरोधी पक्षांविषयी रोष असल्यामुळे, आपल्या देशात शांती-सलोखा-बंधुभावाचे वातावरण निर्माण होऊन, राष्ट्रीय एकात्मता-अखंडता-सद्भावने, "कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंतच्या" भारतिय नागरिकांना एकत्र जोडण्या करीता निःस्वार्थ भावनेने, युवकांचे प्रेरणा स्थान राष्ट्रिय काँग्रेसचे नेते तथा राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांचे नातू आणि माजी पंतप्रधान राजिवजी गांधी यांचे सुपूत्र, स्व. राहुलजी गांधी यांनी,

देशात कडाक्याची थंडी असतांना सुद्धा देशात "भारत जोडो पदयात्रा" काढलेली असून, सदर्हु यात्रेचे महाराष्ट्रात व मुख्यतः दि. १५ नोहेंबर रोजी विदर्भाच्या वाशिम नगरीत आगमन झाले असतांना, शिक्षक आमदार ऍड. किरणराव सरनाईक यांच्या, स्व. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात खा. राहुलजी गांधी मुक्कामी असतांना त्यांनी दि. १६ नोहेंबर रोजी, प्रातःकाळी ०५:३० वाजता, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा आमदार ऍड. किरणराव सरनाईक यांच्याशी सुसंवाद साधला. विशेष म्हणजे याप्रसंगी राहुलजी यांनी किरणरावांच्या, मातोश्री दिवंगत विधानपरिषद सदस्या स्व. मालतीताई सरनाईक यांच्या इंदिराजी सोबतच्या जवळीकतेची क्षणचित्रे बघून माहिती जाणून घेतली. तसेच १९८० - १९९०च्या दशकातिल, स्व. राजीवजी गांधी यांच्याशी असलेल्या तत्कालिन एन एस यु आय ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या आ.ऍड किरणराव सरनाईक यांच्या गांधी घराण्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबधाची माहिती अतिशय जिज्ञासा व उत्साहाने जाणून, स्व.राजीवजी सोबतच्या आ ऍड. किरणराव सरनाईक यांच्या छायाचित्राचा संग्रह बघून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. स्नेहदीप सरनाईक यांनी त्यांना आमदार ऍड किरणराव सरनाईक यांच्या यशस्वी जीवनाचे चरित्र रेखाटणारे किरणोत्सव हे पुस्तक खा.राहुलजी यांना भेट दिले.

त्यानंतर शिक्षकांच्या विविध महत्वाच्या समस्यावर चर्चा करतांना, ऍड किरणराव सरनाईक यांनी, शासनाचे नविन सन २०२० चे शैक्षणिक धोरण शिक्षकांसाठी अन्याय कारक असल्याचे त्यांना पटवून दिले आणि २००५ पूर्वींची जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना ( पेन्शन योजना )सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना लागू करण्यासाठी आपला व काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठींबा असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून खा. राहुलजी यांनी प्रसन्न मुद्रेने, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत साधक बाधक चर्चा केल्याबद्दल, शिक्षक आमदार ऍड किरणराव यांनी व्यक्तिश: खा. राहुलजी यांचे मनःपूर्वक आभार मानले. या सुवर्ण क्षणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार डॉ . के बी देशमुख, प्राचार्य वाहाणे सर, उपप्राचार्य सी. एल. शिंदे,डॉ बी बी देशमुख, डॉ राठोड हजर होते. असे वाशिम येथे वृत्त संकलनाकरीता गेलेले, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे तथा प्रदिप वानखडे यांनी ह्या ऐतिहासिक क्षणाचे वृत्त कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....