कारंजा : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटनेचे, सचिव तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे आजिवन प्रचारक विजय बाबुराव पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच साहित्य लेखन, पत्रकारिता व समाजकार्याद्वारे मानवसेवेला सुरुवात केली होती .
इसन २००८ पासून त्यांनी कारंजा येथे सामाजिक कार्य तथा वारकरी मंडळीची सेवा सुरु केली. शिवाय त्यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या कार्यात सहभागी होत संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांच्या खांद्यांला खांदा लावून कलावंता करीता नागपूर अधिवेशनात मोर्चा, धरणे आंदोलने इ मध्ये हिरीरीने भाग घेवून कलावंताना त्यांचे न्यायहक्क मिळवून दिलेत . त्यांच्या याच कार्याची दखल घेत नुकतेच त्यांना नाशिक येथील शाही समारंभात, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने त्यांना २०२२ चा, आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे . आपल्या यशाचे श्रेय त्यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेला दिले आहे .