कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) :एसआयपी अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेकरता कारंजातील ब्रेन पावर सिप अबॅकसचे 125 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
कृषी विद्यापीठाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात 2 ऑक्टोंबर सोमवार रोजी सकाळी 9.30 वाजता एसआयपी अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भातील 15 केंद्रामधून तब्बल 1500 बाल विद्यार्थी सहभागी होऊन अवघ्या 5 मिनिटात 125 समीकरणे सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. या स्पर्धेत कारंजा ब्रेन पॉवर सिप अबॅकसचे तब्बल 125 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अल्पावधीतच ब्रेन पावर सिप अबॅकस ने विद्यार्थ्यांमध्ये
एकाग्रता,स्मरणशक्ती, आकलन क्षमता,लक्ष निरीक्षण कौशल्य, श्रवण कौशल्य आणि गतिशील अंकगणिताचे कौशल्य विकसित कौशल्याची गोडी निर्माण केली. सदर राज्यस्तरीय स्पर्धेत इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होण्याची ही कारंजातील पहिलीच वेळ आहे.
या स्पर्धेचा प्रारंभ आ.रणधीर सावरकर यांच्या हस्ते तथा एसआयपी अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर, गुणवत्ता विभागाचे प्रमुख जयशंकर, पश्चिम विभागाचे क्षेत्रीय प्रमुख केविन जॉन, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ विभागाचे प्रमुख राजेंद्र नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अभिनव स्पर्धेत विद्यार्थ्यांना अवघ्या 5 मिनिटात 125अंकगणितीय समीकरणे सोडविण्याचे लक्ष देण्यात आलेले आहे. स्पर्धा बघणे व अनुभवणे हा एक चित्तथरारक लक्षवेधक अनुभव आहे. शालेय विद्यार्थी अतिशय अचूक आणि गतीने अंकगणितीय समीकरणे या परीक्षेत सोडवीत असतात. एकाग्रता,स्मरणशक्ती, आकलन क्षमता,लक्ष निरीक्षण कौशल्य, श्रवण कौशल्य आणि गतिशील अंकगणिताचे कौशल्य विकसित कौशल्याच्या सादरीकरणासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय पातळीवर स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. सोमवार, 2 ऑक्टोंबर रोजी आयोजित या स्पर्धा परीक्षेचा नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. एसआयपी अकादमीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर लहान बालकांच्या कौशल्य विकासासाठी एसआयपी अबँकस हा कार्यक्रम देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. कारंजातील ब्रेन पॉवर सीप अबॅकसचे संचालक मोहित गावंडे व त्यांची संपूर्ण चमुही विद्यार्थ्यांवर मेहनत घेत आहेत.