वाशिम : बंगालच्या उपसागरापासून तर अरबी समुद्रापर्यंत वातावरणात कमी दाबाच्या हवेचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम महाराष्ट्रावर घोंघावणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर झाला असल्याने आकाशात मोसमी ढगांची गर्दी वाढली असून येत्या दि १३ ते १७ ऑगष्ट २०२५ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रासह मरठवाडा,पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, झाडीपट्टी, देशपट्टी, घाटमाथ्यासह भंडारा,वर्धा, चंद्रपूर,वाशिम, बुलडाणा,अकोला,अमरावती, यवतमाळ, हिंगोली,नांदेड जिल्ह्यात गडगडाटी वादळवारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी राज्यातील हवामान विभागाच्या हवाल्याने व्यक्त केला आहे. शिवाय या संदर्भात त्यांनी जिल्ह्याचे लोकप्रिय हवामान अभ्यासक गोपालभाऊ गावंडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीही पावसाच्या अंदाजाला दुजोरा देतांना स्पष्ट केले की, ऑगस्ट महिन्याचे उत्तरार्धातही दमदार पाऊस अपेक्षित असून स दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज असून दि १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत भाग बदलवीत चांगला पाऊस होणार आहे.असे जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी कळवीले आहे.त्यामुळे ग्रामस्थ शेतकरी यांनी सतर्क राहून अतिपावसाची शक्यता लक्षात घेऊनच प्रवास करावा.शेतातून परततांना पांदनरस्ते,नदीनाल्याला पूर किंवा पुलावरून पाणी वाहत असतांना स्वतः मार्गक्रमण करू नये.आपली गुरे ढोरे, शेळ्या मेंढ्या काढू नये किंवा दुचाकी चार चाकी वाहने टाकू नये. विजा चमकत असतांना शेतात आणि हिरव्या झाडा खाली थांबू नये. इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स साधने व मोबाईल फोन बंद ठेवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी शेतकरी, ग्रामस्थ व सर्वसामान्य नागरीकांना केले आहे.