कारंजा : स्थानिक पोहा वेश परिसरातील मोठे श्रीराममंदिर कारंजा येथे,श्रीराम नवमी उत्सवानिमित्त स्थानिक श्री श्रीराम नवमी उत्सव समिती, विश्व हिंदु परिषद,बजरंगदल आणि समस्त कारंजेकर रामभक्तांकडून मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. या श्री श्रीराम नवरात्रौत्सवात, महाराष्ट्रभूषण सप्तखंजेरी प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज शिरसोलीकर यांचे शिष्य हभप गोपाल महाराज ठिलोरकर यांचे १४ वर्षीय सुपूत्र बाल प्रबोधनकार चि.वैभव महाराज ठिलोरकर यांनी सप्तखंजेरीवर प्रबोधन सादर केले.
त्यावेळी कारंजा येथील हजारो वाचक रसिकांनी त्यांच्या कार्यक्रमाला चांगलीच दाद दिली. चि. वैभव ठिलोरकर याला गोपाल महाराज ठिलोरकर, पेटकर - गौरव गोपाल ठिलोरकर, तबला वादक - ईश्वर वानखडे, निरंजन पाटील वानखडे, बॅन्जो - भानुदास भगत आदींनी साथ संगत केली. यावेळी कारंजा येथील जवळ जवळ सर्वच मान्यवरांची उपस्थिती होती.
श्री श्रीराम नवमी उत्सव समिती कारंजा तर्फे मंगेश कडेल, नितीन गढवाले, गणेश बाबरे, आशिष तांबोळकर , समिर देशपांडे,अमोल अघम, तेजपालसिंग भाटीया, आशिष गावंडे, पत्रकार गोपाल पाटील भोयर, संदिप गढवाले, संदिप कुन्हे, जिग्नेश लोढाया, बंटी डेडूळे, राम देशमुख, हर्षल मंत्री रणजीत वडतकर, चंद्रकांत रावळे, सतिश मुंदे, राम देशमुख, कुणाल महाजन, ब्रिज वानखडे, विक्की पहाड, रघुनाथ वानखडे, अतुल धाकतोड, अजय देवरणकर, ओम चौधरी, अजय श्रीवास, काण्णवजी, सुरज कवळे, रोडे बंधू, मयूर रागवाणी, रॉय, दादाराव सोनिवाळ इत्यादी मान्यवरांनी हभप गोपाल महाराज ठिलोरकर व चि बैभव महाराज ठिलोरकर या पितापुत्राचा सत्कार केला. असे वृत्त मिळाले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....