नायदेव , मोहबाळा या परिसरात वेकोली द्वारे कोळसा काढण्यासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंग मुळे परिसरातील अनेक घरांना भेगा गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकोणा, चरुर (खटी), मोहबाळा, नायदेव,येथील अनेक घरांना वेकोलि च्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना भेगा पडलेल्या आहेत, या परिसरातील मोकाशी ले-आउट, गुरुदेव नगर वृंदावन ले-आउट, येथील रहिवासी सुद्धा या ब्लास्टिंग मुळे भयभीत झालेले आहे वेकोलीच्या ब्लास्टिंग मुळे हादरे बसून घरातील साहित्य, भांडे हे नेहमीच पडत असल्याने गृहिणींना सुद्धा या होणाऱ्या त्रासाचा सामना करणे नित्याचे झालेले आहे हा परिसर, वस्ती मागासवर्गीय असून यात अनेक वृद्ध वयस्कर नागरिक तथा लहान मुले राहत असल्यामुळे त्यांच्याही आरोग्याला, जीविताला धोका निर्माण झालेला आहे, नित्याने घडणाऱ्या या परिस्थितीमुळे विकोलीच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करून याचा नागरिकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचे निवेदन हंसराज अहिर, ओबीसी आयोग अध्यक्ष यांना मोहबळ्याचे सरपंच नंदकुमार टेंभुर्डे , नागरिकाद्वारे देण्यात आले आहे.