वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) मा.शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे आगामी 2024 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकिच्याअनुषंगाने, पक्षबांधणी करीता महाराष्ट्र दौर्यावर असून,त्यांच्या दौऱ्यातील पहिला टप्पा 9 जुलै रोजी,मा.उद्धवजी ठाकरे हे वाशिम जिल्ह्यातील,बंजाराकाशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील श्री जगदंबा मातेचे व महंतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेऊन दौऱ्याची सुरवात करणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना पश्चिम विदर्भ संपर्क नेते खा.अरविंद सावंत व वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव हे राहणार आहेत. 9 जुलैला दुपारी 1:00 वा.पोहरादेवी येथे दर्शन घेणार आहेत त्यानंतर दुपारी 2:30 वा. दिग्रस येथे यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा व वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत.त्यानंतर दुपारी 3:00 वाजता,वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याशी चर्चा व 3:30 वाजता जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी,युवासेना,युवती सेनेच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांशी संवाद साधणार असून त्याकरीता, संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व शिवसेना,महिला आघाडी,युवासेना,युवतीसेनेच्यां सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन वाशिम जिल्हा प्रमुख सुधीर कव्हर यांनी केले आहे.