अकोल्यातील चांदेकर चौकातील एका बँकेजवळ काही जण येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना संशयास्पद स्थितीत आढळल्याने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून झडप घातली असता, दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना पोलिसांनी मोठ्या शस्त्र साठ्यासाह अटक केलीय.पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना खबरीकडून अकोल्यातील चांदेकर चौकातील बँक ऑफ इंडिया च्या शाखेवर शस्त्रधारी संशयित चार ते पाच जण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली.
माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून चौघांना रंगेहाथ अटक केली. चौघांकडून जवळून दोन लोखंडी कट्टे ज्यात 06 जीवंत राउण्ड काडतुसे आढळून आली. तसेच 10 प्राणघातक शस्त्र ज्यात चार तलवार, कोयता, सूरी, चाकू, भाला, लोखंडी रॉड, 2 कत्ते, फायटर, तसेच नॉयलोंन दोरी, मिरची पूड आदी दरोड्याचे साहित्य आढळून आले.आरोपींमध्ये दीपक रामु अंभोरे, नितेश महादेव वाकोडे, शुभम संजय गवई आणि अनिल दादाराव भालेराव तसेच एक महिला आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाली आहे. त्या महिला आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.