वाशिम:-दि. ४ ते ६ नोव्हे. ला खडवली जि.ठाणे येथे पार पडलेल्या ३३ वी महिला सिनिअर राज्यस्तरीय आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेत मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा, मंगरूळपिर जि.वाशिम या शाळेतील विद्यार्थिनी कु राधा ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करीत तिची महाराष्ट्र राज्य "आट्या पाट्या" महामंडळा तर्फे महाराष्ट्राच्या "आट्या-पाट्या" संघात निवड करण्यात आली आहे. सदर विद्यार्थिनी शेगांव जि.बुलढाणा येथे होनाऱ्या नॅशनल आट्या-पाट्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करेल. सदर विद्यार्थिनीच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल तिचे वाशिम-मंगरूळपिर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामभाऊ खोडे,प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
सदर विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, क्रीडा उपसंचालक संतान,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, आट्या-पाट्या क्रीडा मार्गदर्शक किशोर बोण्डे,मातोश्री पार्वतीबाई नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्राचार्य संतोष राठोड, प्राचार्य बाळासाहेब गोटे, कुलदीप बदर, विजय खोखले, हितवा बेनिवाले, सुनिल देशमुख,शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने, पार्थ राठोड,ऋषीकेश देशमुख,मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या कु सुनिता पवार मॅडम,क्रीडा शिक्षक एम.डब्लू.भगत, क्रिडा व्यवस्थापक एन.आर.राठोड, शाळेचे जेष्ठ शिक्षक आर.एच.रघुवंशी, पी.एस.दारव्हेकर, ए.जे.राठोड, ए.एन. खाडे,कु.खुशबू राठोड,कु.लीला ठाकरे, कु.मंगला आंधळे, कु.जयश्री राठोड, निरंजन पवार, शिपाई बाळू भगत,शिवदास बुधे,विनायक पवार, राविभाऊ जाधव यांना दिले.कु.राधा ज्ञानेश्वर जाधव हिच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल मातोश्री पार्वतीबाई नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्राचार्य संतोष राठोड, शाळेच्या प्राचार्या कु सुनिता पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कु.राधा ज्ञानेश्वर जाधव चे अभिनंदन करीत राष्ट्रीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरातून तिचे कौतुक होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....