वरोरा---
वरोरा ते वडगाव ही बस सेवा काही वर्षापूर्वी चालू होती मात्र ती अचानक बंद झाल्याने विद्यार्थी शेतकरी नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बस सेवा त्वरित चालू करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी ताकीद शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्ता बोरे कर यांनी वरोरा आगाराला देताच बस सेवा सुरू झाली.
शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमूख दत्ता बोरेकर, युवासेना तालुका समन्वयक-शुभम कोहपरे तसेच युवासैनिक तुषार बोरेकर यांनी सतत आगार प्रमुखांना निवेदने तसेच मागणी करुन वडगांव या गावाला बस सेवा चालू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आगार प्रमुख वरोरा यांनी शिवसेना पदाधिकारी, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता वरोरा - वडगाव बस सेवा चालू केली बस गावात पोहोचताच गावातील नागरिक विद्यार्थ्यांनी बसचे स्वागत, पूजन केले.
वडगांव वासियानी, विद्यार्थ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख-दत्ताभाऊ बोरेकर,युवासेना तालुका समन् युवासैनिक-तुषार बोरेकर व वरोरा आगार प्रमुख यांचे
गुणवंतजी कोकांडे, रमेशजी दातारकर, सतीशजी बोरेकर, भास्करजी उईके, प्रकाशजी कोकांडे, सुनीलजी मडावी, गुणवंतजी बोरेकर, नत्थुजी पोंगडे, सुरेशजी बोरेकर, विलासजी डावे, संजयजी पेटकर, विजयभाऊ धोटे, शुभमभाऊ कोकांडे, राकेशभाऊ पेटकर, अजय दातारकर, तुषार बोरेकर, प्रशांत धोटे, रोहन गोचे, वैभव बोरेकर, साहिल लडके यांनी आभार मानले.
*मनिष भुसारी वरोरा*
आपल्या प्रतिक्रिया द्या....