जिल्ह्यात 8 ऑगस्ट रोजी पडलेल्या संततधार पावसाने कहर केला असून 18 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. परिणामी जनजीवन प्रभावित होऊन नागरिकांना गैसविता सामना करावा लागला. दोन गावांचा संपर्क तुटला असून या पावसाचा तडाखा भंडारा शहरालाही बसून शहरातील बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या ऑरेंज अलर्ट च्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाने 10 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील परिस्थिती बिकट झाली होती. त्यानंतर पाऊस बंद होऊन जनजीवन तळ्यावर आले होते. मात्र कालपासून सुरू असलेला पाऊस पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढविणार आहे. 8 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आणि त्याचे विपरीत परिणाम पुढे आले.
भंडारा तालुका 140, मोहाडी 83, पवनी 71 आणि लाखनी 66 मिलिमीटर अशी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळाला. भंडारा शहरातील खात भागात असलेल्या रुक्मिणी नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग न सापडल्याने हे पाणी लोकांच्या घरात घुसून नुकसान करून गेले. हात रोड मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आजही हे पाणी पंपाच्या साह्याने काढण्याचे काम सुरू होते. सखल भागात असलेल्या काही दुकानांमध्ये शिरलेल्या पाण्याने मालमत्तेचे नुकसान केले. शहरातील बऱ्याच भागांमधील लहान मोठ्या रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र दिसत होते.
काढता येतील टोलनाका परिसरात साचलेल्या पाण्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. या पावसाने जिल्ह्यातील जवळपास 18 मार्ग बंद झाले. नाल्यावर असलेल्या पुलावर किंवा सखल भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी व साकोली या तालुक्यातील मार्ग बंद झाले होते. यात भंडारा Bhandara तालुक्यायात कारधा खमारी, पवनी तालुक्यातील पवनी ते जुनोना, निलज ते काकेपर, तुमसर तालुक्यातील सिलेगाव ते वाहनी, साकोली तालुक्यातील वडेगाव ते खांबा, साकोली ते विरशी व मोहाडी तालुक्यातील आंधळगाव ते पेट, विटगाव ते टांगा, डोंगरगाव ते कानळगाव, अकोला ते वडेगाव, चिचोली ते शिवनी, चिचोली ते नवेगाव, रोहना ते इंदूरका, महालगाव ते मोरगाव, चाउंडेश्वरी लहान पूल, मोहाडी ते मांडेसर, टांगा ते विहीरगाव, उसर्रा ते टाकला यांचा समावेश आहे. यातील बऱ्याच गावांचा प्रशासनाशी संपर्क तुटला असून बंद मार्गावरून कोणीही प्रवास करू नये या दृष्टीने प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. नागरिकांनी धोका पत्करून पाणी असताना प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. नदी काठावरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
आज शाळांना सुट्टी
भंडारा जिल्ह्याला असल्याने संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय खाजगी शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी आणि शिकवणी वर्ग यांना सुट्टी सुट्टी घोषित करून त्या अनुषंगाने आदेश काढले आहेत.