कारंजा : (लाड): दोंडाईचा धुळे जिल्हा येथे 1आक्टोंबर 2022 ते 3 आक्टोंबर 2022 दरम्यान 35 सब ज्युनिअर राज्यस्तरीय टेनीक्वाईट स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने उपविजयी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. वाशिम जिल्ह्याच्या संघामध्ये अमोल जोंधळेकर,उत्कर्ष पुणेवार, नैतिक वर्मा, मंथन म्हातारमारे, तन्मय लावरवार, कार्तिक गुडदे, तसेच अक्षरा नेटके या लोकमान्य व्यायाम शाळा कारंजाच्या खेळाडूंचा समावेश होता.
तसेच या स्पर्धेमध्ये वैयक्तिक प्रकारात कु. अक्षरा नेटके महाराष्ट्रातून विजय ठरली. तसेच दुहेरी प्रकारात अमोल जोंधळेकर व नैतिक वर्मा उपविजयी ठरले त्याचप्रमाणे वैयक्तिक प्रकारात मंथन म्हातारमारे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतून मुला मुलींचा महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला.
कुमारी अक्षरा नेटके हिची महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. तसेच मुलांच्या संघांमध्ये अमोल जोंधळेकर, मंथन म्हातारमारे, यांची निवड करण्यात आली. व उत्कर्ष पुणेवार याची अतिरिक्त खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. खेळाडूंच्या व प्रशिक्षक अक्षय गवारे यांच्या या यशाबद्दल राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, गोपाल राऊत, आनंद पेंटे, विजय मोटघरे, प्रभाकर घोडसाड, सौरभ तोमर, विवेक गहाणकरी, राहूल मोहोड व लोकमान्य व्यायाम शाळेच्या सर्व सदस्यांनी कौतुक केले. यामध्ये युवा पत्रकार दामोधर जोंधळेकर यांचे चिरंजीव अमोल जोंधळेकर याचा सुद्धा खेळ प्रभावी ठरला व त्याने सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, सचिव उमेश अनासाने, विजय खंडार, लोमेश पाटील चौधरी यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.