कारंजा (लाड) : इ.सन १९८० पासून, कारंजा नगरीत,कलेचे विविध कार्यक्रम त्याकाळी कारंजा जोसिज क्लब,दुर्गोत्सव मंडळ,गणेशोत्सव मंडळाद्वारे आयोजीत करून, कलेला प्रोत्साहन देत,कलाकारांच्या निर्मितीचे कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कारंजा शहरातील तत्कालिन जेसीज क्लबचे अध्यक्ष,कारंजा नगरीचे माजी नगराध्यक्ष बटूकसेठ उर्फ अरविंदजी लाठीया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना,ईरो फिल्मस म्युझिक,अखिल भारतिय नाट्य परिषद,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था, आदर्श जय भारत संगीत परिवार यांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात, डॉ इम्तियाज लुलानिया,संजय कडोळे यांनी कारंजा शहरातील कलावंत घडविण्यात कलेचे भिष्माचार्य अरविंद लाठीया यांचे अमूल्य योगदान असल्याचे स्पष्ट केले. सन १९८० पासून दोन दशकापर्यंत कारंजा जेसिजचा सप्ताह दरवर्षी आयोजीत करून अरविंद लाठिया व त्यांची जेसीज मित्रमंडळी विविध कलास्पर्धा आयोजीत करून,कारंजा शहरात कलावंताना घडविण्याचे कार्य करीत होते असे स्पष्ट केले.
तसेच कारंजा नगरीमध्ये त्यांनी जेसिज बालोद्यान,स्विमिग टँक इ. संस्मरणिय उपक्रम केले.याप्रसंगी अ भा मराठी नाट्य परिषद निवडणूक उमेद्वार नंदकिशोर कव्हळकर यांनी अरविंद लाठीया यांचे आशिर्वाद घेतले.तेव्हा अरविंद लाठीया म्हणाले, "कलाकाराला उत्तेजन देण्याकरीता तन मन धनाने सहकार्य केले पाहीजे.कलाकार हा मनोरंजना सोबतच समाजप्रबोधन व देशभक्ती करीत असतो." असे ते म्हणाले.तसेच अ भा मराठी नाट्य परिषदेचे उमेद्वार असलेल्या नंदकिशोर कव्हळकर या चारित्र्यवान व नि:स्वार्थी कलावंताला निवडून देण्याचे,नाट्य कलावंताना त्यांनी आवाहन केले.कार्यक्रमाला डॉ ज्ञानेश्वर गरड,डॉ इम्तियाज लुलानिया,संजय कडोळे,प्रदिप वानखडे,कांचन चौधरी,गोपिनाथ डेंडूळे, देविदास नांदेकर ,रोमिल लाठीया इत्यादी उपस्थित होते.