गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेली आरमोरी आणि ग्रामपंचायत पासून वाटचाल सुरू करणारी आज नगरपरिषद म्हणून नावारूपाला आलेली नगरपरिषद आरमोरी विकासाच्या रस्त्याने चालतांना सामोर विकसित आणि मागे अविकसित असल्याची सावली दिसत आहेत.
नगरपरिषद आरमोरी प्रत्येक वार्डात भूमिगत नाल्या,सिमेंट रस्ते बनविण्यात व्यस्त आहे त्यातही स्वच्छता आणि आरोग्यासाठी विविध कामे करणारी यंत्रणाही सज्ज असूनही नगर परिषद आरमोरी दिवसा दिसत नसल्यासारखी वागताना दिसत आहे.
भगतसिंग चौकात आय लव्ह आरमोरीच्या खाली काही दिवसांपूर्वी नगरपरिषद आरमोरीचा स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा बॅनर दर्शनी भागावर झळकत होता मात्र चार दिवसापासून तो मागच्या बाजूने पालोरा रोडच्या बाजूने झळकत आहे पण तोही उलटा!
यावरून असे लक्षात येते की शुभेच्छा बॅनर लावतांना नगर परिषदेच्या हद्दीत असलेले बॅनर हे कवडीमोल किमतीचे आहेत आणि बहुतेक शुभेच्छा बॅनरमुळे अतिरिक्त रोख रक्कम जमा होत असेल असे दिसतात बॅनरवर लिहिल्या पैकी तो बॅनर कचरा कुंडीत जमा करण्याच्या लायकीचे आहेत.
संबंधित बॅनर बद्दल नगरपरिषद आरमोरीच्या नगराध्यक्ष यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.