दिनांक २४जून रोजी अवैधरीत्या रात्री 10 वाजता सुमारास 3 बैल, गोवंश घेवुन जानारे पिकअप वाहना क. एम.ए.४८ ए.जी. ३१७४ अटक करीत26000 चा मुद्देमाल जप्त केला. वाहनामध्ये अवैध्य रित्या, निर्दयतने ३ बैल एकुन किंमत ६०,००० घेऊन जात असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून नंदोरी टोलनाका येथे 3 बैल, चारचाकी वाहन जप्त केले. बैल गोरक्षण वरोरा येथे दाखल करण्यात आले तसेच पिकअप वाहना क. एम.ए.४८ ए.जी. ३१७४ ची कि.२००००० रुपयाचे जप्त करण्यात आले. अल्पवयीन मुलगा याला बाल न्यायलयासमोर हजर केले तसेच आरोपी प्रणय दामोधर चावरे रा. बोडखा जि. चंद्रपुर यास अटक करण्यात आली न्यायालयाने आरोपीची करागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, मा. नयोमी साटम मॅडम, सहायक पोलिस अधिक्षक तथा पोलिस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनामध्ये पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे, पोहवा पवार, पोहवा, किशोर बोंढे यांनी केली.