चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेला ब्रह्मपुरी तालुका दिवसा रात्रीचा फायदा घेत काळे धंदे जोमात सुरू असून यांवर आळा घालने गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकाकडून व्यक्त होत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात रेती तस्करी काही नवीन बाब नाही. वैनगंगा नदी घाटावर भरपूर प्रमाणात रेती घाट आहेत. मात्र अ-हेरनवरगाव रेती घाटावर एल. पी . गाडीने भरपूर प्रमाणात सुपर एन्ट्री द्या आणि बिंनधास्त रेती घेऊन जा असल्याने ब्रह्मपुरी स्थानिक महसूल विभाग देखील याकडे मुद्दाम पणे दुर्लक्ष करीत आहे. बिनधोकपने सुपर एन्ट्री देण्यासाठी कुणा सोबत सेटिंग लावून घ्यायची असेल तर दर महिन्याला तिस हजार रुपये महिना एका दलालाकडे दिली जातो तो दलाल महसूल अधिकाऱ्याला दर महिन्याला पैशाच्या पिशव्या त्यांच्या हातामध्ये सोपवण्याचा काम हा दलाल करीत आहे हा दलाल दुसरा तिसरा कोणी नसून हा दलाल वाळू माफिया ब्रह्मपुरी महसूल कार्यालयात दररोज चकरा मारणारा दलाल असल्याचे कळते मात्र सर्वांनाच माहित आहे. रेती तस्करांनी ब्रह्मपुरी महसूल कार्यालय तथा पोलीस स्टेशन हप्ते बांधलेले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडुन मिळाली आहे एक दलाल या रेती तस्करामधील व प्रशासनातील दुवा असल्याची माहिती आहे. या दलालाकडून दर महिन्याला कारवाई न करण्यासाठी पाकीट महसूल विभागाला दिली जातो प्रत्येक एल.पी गाडी कडून पंचवीस हजार ते तीस हजार रुपये तहसील व पोलीस प्रशासनाला जात असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे. त्यामुळेच प्रशासन या तस्करांना मुस्क्या आवळण्याचे सोडून त्यांना खुली परवानगी देऊन प्रशासकीय अधिकारी शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवीत आहेत. तस्करीवर आळा घालण्यासाठी एकही पथक नेमले गेले नाही रेती मात्र तस्कर दलाल प्रशासन व राजकीय पाठवन असलेला कार्यकर्त्याच्या युक्तीने ब्रह्मपुरी तालुक्यातील, अ-हेर नवरगाव,अवैध रेतीचे उत्खनन करून तस्करी केली जात आहे असल्याचे चर्चा सध्या ब्रह्मपुरी तालुक्यात सुरू आहे.