पडोली ते घुग्घुस मार्गावर दोन ट्रकमधून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गस्त घालत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकीरण मडावी व पोलिस कर्मचारी शहाजी खांडरे, किशोर वाकाटे यांनी दोन्ही ट्रक अडविण्याच्या सूचना दिल्या. चालकांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 2 ट्रकसह 30 लाख 40 हजार रुपयांचा माल जप्त केला. अविनाश नारायण ठाकुरिया आणि सरफराज खान भुरेखान पठाण अशी अटकेतील आरोपींची नावे आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकिरण मडावी हे शहाजी खांडरे, किशोर वाकाटे यांच्यासह गस्त घालत होते. दरम्यान, रमाबाई नगरच्या अष्टभुजा वॉर्डात राहणारे अविनाश नारायण ठाकुरिया व सरफराज खान भुरेखान पठाण, रा.नेताजी चौक, बाबूपेठ हे ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 5863 व ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 5864 वाहनाने पडोली ते घुग्घुस मार्गाने रेतीची वाहतूक करीत असल्याचा संशय होता. दोन्ही ट्रकवर संशय आल्याने पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक अडवला. ट्रकचालकाकडे चौकशी केली असता, दोन्ही ट्रकचालकांनी तिसऱ्या आरोपीच्या सांगण्यावरून हे काम केल्याची माहिती पोलिसांना दिली. रेतीची चोरी करून वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी दोन्ही ट्रक जवळपास 20 हजार रुपयांचीकेली. आरोपींकडून पोलिसांनी दोन्ही ट्रक जवळपास 20 हजार रुपयांची रेती असा एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.