दि. ४ फेब्रुवारी रोजी, वाशिम बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय वाशिम येथे सत्ताधारी बाळासाहेब शिवसेना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्या तथा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होऊन येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तिर्थक्षेत्र बंजारा काशी पोहरादेवी येथील त्यांच्या दि . १२ फेब्रुवारी रोजीच्या दौर्याचे निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या आयोजनाचे नियोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब शिवसेनाच्या पहिल्या फळीतील नेत्या असलेल्या,वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी ह्या बैठकीच्या प्रमुख मार्गदर्शक होत्या त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांना श्रीक्षेत्र पोहरादेवी दौऱ्या विषयी आणि वाढदिवसाचे दिवशी आयोजीत कायक्रमा बद्दल सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन केले,वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे व गोरगरिबांची कामे कसे मार्गी लावता येईल यावर मार्गदर्शनही त्यांचेकडून करण्यात आले. शिवाय केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या विविध विकास कामाच्या मुद्द्यावरही विशेष चर्चा करण्यात आली . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यामध्ये, बाळासाहेब शिवसेना शाखेच्या अनावरणाची घोषणाही करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे, विजय खानझोडे, उपजिल्हा प्रमुख मनोज पाटील दहातोंडे, युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे,वाशिम तालुका प्रमुख प्रकाश पाटील महाले, मालेगाव तालुका प्रमुख, कारंजा तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, कारंजा शहर प्रमुख अरुण बिकड, मानोरा तालुका प्रमुख डॉ . दिपक पाटील करसाडे, प्रशांत भडादे,रिसोड, मंगरूळपिर वगैरे गावातील तालुकाप्रमुख, शहर प्रमुख,महिला पदाधिकारी व तमाम शिवसैनिक उपस्थिती होती वृत्त आमचे प्रतिनिधी शंकर पाटील ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.