जिवनावश्यक किराणा,नविन धोतरजोडी,नऊवारी पातळासह कपडे,दिवाळीचे मिष्टान्न देवून निराधारांच्या चेहर्यावर खुलवीले हास्य.
(चौकट:- ज्या भागात वाहन जात नाही अशा पालघरच्या सहा गावात ४० निराधार कुटुंबांकरीता अक्षरशः डोक्यावर किराणाची किट कपडे व फराळाचे साहित्य नेऊन वाटप करण्यात आले.)
कारंजा लाड :
"मदत तुमची छोटी-मोठी,हास्य येईल कुणाच्या तरी ओठी" ;हे सेवाव्रती ब्रिद घेऊन "एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्ट" ह्या संस्थेने अकोला-वाशिम-यवतमाळ-पालघर जिल्हा परिसरात गेल्या चार वर्षांपासून समाजातील गरजू, निराधार व वंचित घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याची सेवा आरंभ केलेली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणेच यावर्षीदेखील दिवाळीच्या सणानिमित्त ह्या संस्थेने तब्बल ३११ झोपड्यांमध्ये किराणा किट,कपडे,फराळ आणि मिठाईचे साहित्य वाटप करून गोरगरीब,वंचितांच्या अंधारलेल्या घरातही दिवाळीचे दिप उजळवीले आहेत.
शिवाय एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने १०० कुटुंबही दत्तक घेतले आहेत.त्यांना दर महिन्याला किराणा व आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे काम प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन केली जाते.
गरजु व निराधार कुटुंब ज्यांच्याकडे एकवेळ जेवणाची व्यवस्था नाही ज्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही व जे थकलेले आहेत अशा व्यक्तींना किराणा किट देण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून एक ऊब जाणिवेची सातत्याने करीत आहे. या संस्थेमधील सदस्य एकमेकांशी व्हाट्सअप ग्रुपने जुळलेले आहेत.स्वतःच्या,मुलांचे,मुलींचे, पत्नीचे,आई-वडिल व मित्रांचे वाढदिवस,आनंदाचे क्षण साजरे करताना स्वेच्छेने विशिष्ट रक्कम संस्थेच्या खात्यात टाकतात. कोणी आप्तस्वकीयांचे दुःख बाजूला ठेवून तेरवी व होणारा इतर खर्चही एक ऊब जाणिवेची संस्थेला देतात. यामध्ये व्यापारी, डॉक्टर, इंजिनीअर,पोलिस,शिक्षक, कारागीर, तलाठी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, सुरक्षारक्षक,आपल्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतूनही छोटीशी रक्कम देणारे विद्यार्थी अशी विविध क्षेत्रांतील महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील देणगीदार संस्थेला देणगी पाठवीत असतात.ज्या कुटुंबांना यामध्ये मदत केली जाते ते प्रामुख्याने वाशिम,यवतमाळ, अकोला व पालघर जिल्ह्यातील आहेत.मिशन दिवाळी या उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा,कारंजा व मंगरूळपीरसह पालघर, यवतमाळ जिल्ह्यातील कुटुंबांना या संस्थेकडून किराणा किट, कपडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले आहे.या मिशन दिवाळीमुळे अनेक कुटुंबांची दिवाळी ही तेजोमय व आनंदी झाली आहे हे मात्र निश्चित. एकीकडे सर्व लोक आपापल्या घरची दिवाळी चांगली साजरी होण्यासाठी मेहनत घेताना दिसत होते तर एक ऊब जाणिवेची परिवारातील सदस्य जवळपास ३२ पदार्थांसह चिवडा व बर्फी व कपडे अशी कीट तयार करत होते.
१५०० किलोमीटरचा प्रवास करत ती कीट गरजू,दिव्यांग व ज्यांचे करणार कोणी नाही.अशा गरजू व्यक्तींच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम २० दिवसांपासून दिवाळीच्या आदल्या रात्रीपर्यंत जवळपास करत होते.देशातील विविध राज्यांसह विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांकडूनही मदत मिळत असते.गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्टला महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, पालघर, पुणे, अमरावती, नाशिक सह अनेक जिल्ह्यांतून सातत्याने मदत मिळत असते. गुजरात,ओरिसा या राज्यांतून मदत येत राहते.शिवाय अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, साऊथ आफ्रिका यांसारख्या देशातूनही मदतीची साथ मिळत आहे. अनेक देणगीदार हे पैसे आणि धान्य या रूपात आपली मदत करीत आहे.वाशिम जिल्ह्यासोबतच यवतमाळ, अकोला व पालघर जिल्ह्यातही आपली मदत पोहोचवण्याचे काम एक ऊब जाणिवेची करीत आहे.असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....