आजची पिढी ही एकविसाव्या शतकातील पिढी होय. आजच्या मुलांना ज्ञान देण्याची गरज नाही तर त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचे उपयोजना करणे गरजेचे आहे.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम असे म्हणतात की शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात, विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
सांगायचे म्हणजे
" शालेय उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. यात शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश असतो. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये प्राप्त होतात, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढतात."
मोठ्या प्रमाणावर शासन विविध उपक्रम राबवित असतो त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो अस वाटत..पण ते खर आहे का? काहींना वाटेल की खरं आहे तर काही म्हणतील हे साप खोटं आहे. शासन एखादा उपक्रम घेऊन येतोय तर तो उटसूट घेऊन येत नाहीत तर विविध तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन किंव्हा एखादा उपक्रम कोणी तरी सफल केला असेल तर अश्याच उपक्रमांना तपासाअंती मान्यता मिळते.
उपक्रमांनी मुल पारंगत होतात कारण उपक्रमामुळे मुलांना प्रत्यक्ष कृती करायला मिळत म्हणजे आपण कोणताही उपक्रम घेऊन आलोय तर मुल त्यात प्रत्यक्ष सहभागी होतात. प्रत्यक्षात साक्षात्कार झाले की मुलांचे ज्ञान समृद्ध होते तसेच मुलांचे व्यक्तिमत्त्व सुध्दा फुलते. मुलांना फक्त फळ्यावर रेखाटन करून वा तोंडाने बोलून खरे ज्ञान देता येणार नाही.
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री असे म्हणतात की, हर कामकी अपनी एक गरीमा है |और हर कामको अपनी पुरी क्षमतासे करनेमेही संतोष मिलता है |
आपण स्वतःचे मोठेपण विसरून जर विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना सर्वतोपरी प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न केला तेव्हाच मुलांचे ज्ञान समृद्ध व परिपूर्ण होऊ शकतं. आज शासन शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवितात. उदा .अध्ययन स्तर, पॅट विविध कृती आराखडे, चावडी वाचन , दप्तर मुक्त शनिवार ,स्थानिक उपक्रम जसे विविध क्रीडा स्पर्धा , गायन,वादन, नृत्य,अभिनय ,लेखन ,वाचन यासारखे कला प्रकार. या उपक्रमामुळे मुलांमधील जिज्ञासू वृत्तीला चालना मिळते. अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.मुलांच्या कला गुणांना वाव या उपक्रमामुळे मिळते.
"डॉ. कलाम यांचे मत होते की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे".
एकीकडे या उपक्रमाला राबविण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यात मात्र आपल्याला मतभेद पाहायला मिळतात. कुठे पालक सकारात्मक असतो तर कुठे शिक्षक ....काही ठिकाणी याहीपेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळते. माझी शाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह पंचायत समिती जिवती जिल्हा चंद्रपूर येथे असून जवळपास तेलंगाना सीमेवर अगदी डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहे. जी मागील १०/१२ वर्षापासून वर्षाची ३६५ दिवस सुरू असते.
आज मला शालेय स्तरावर शालेय व सहशालेय उपक्रमामुळे या शाळेतील मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. एखादा उपक्रम राबविला की तो काही कालावधी करिता नसावा कारण त्याचे परिणाम जर आपल्याला बघायचे असेल तर त्या उपक्रमात सातत्य असणे फार महत्वाचे आहे. आज या शाळेत शालेय स्तरावर शालेय उपक्रम राबविल्याने या शाळेतील मुलांनी राज्यस्तरावर नृत्य व क्रीडा प्रकारात झेप घेतली आहे.
बिना स्वार्थ किसिका भला करके तो देखो,
आपकी सारी उलझनेभी सुलझ जाएगी...
ते का शक्य झाले तर त्यातील सातत्य आणि शिक्षकाचे प्रामाणिक प्रयत्न हेच म्हणता येईल.दुसरे सांगायचे झाले तर या शाळेतील मुलांना इस्रो सारख्या ठिकाणी जायची संधी मिळाली.सोबतच वेगवेगळ्या ऐतिहासीक ठिकाणांना भेट देता आली. हैदराबाद टुर, औरंगाबाद टुर त्यामुळे मुलांच्या शिक्षणातील गती व या उक्रमाअंतर्गत सहभागी होण्याची जिद्द मुलांमध्ये वाढीस लागली.
मला असे वाटत की मुलांना शिकण्याचा अट्टाहास नको तर त्याला काय जमतं, त्याची रुची काय,हे पाहून त्याला त्यानुसार संधी उपलब्ध करून देता येईल का?याचा विचार व्हायला पाहिजे. आज माझ्या शाळेची सुरुवात पहाटे ४:३० ते ७:०० पर्यंत विविध खेळांची तयारी करून घेण्यासाठी केला जातोय. उदा. धावणे १०० मीटर,२०० मीटर ४०० मीटर ,रीले व खो-खो त्यामुळे आज शाळेत सन्मान चिन्ह ठेवण्यासाठी जागा कमी पडते.
एक शायर असा म्हणतो...
*वक्त की लहरोंसे टकराते हुए बढ जाइए,*
*फेरकर मुंह जिंदगी का सामना मुमकीन नही...*
तरी या मुलांना शासन स्तरावर तशी संधी मिळत नाही ती फक्त बीट,तालुका जास्तीत जास्त जिल्हा बस... !त्यामुळे मुलांचे कला व क्रीडा या प्रकारातील नैपुण्य त्यांना सिद्ध करण्याची संधी मिळत नाही.पण मी या अश्या मुलांना विविध असोशिएशन चे खेळ असतात त्यात त्यांना सहभागी करून घेतोय त्यामुळे मुलांना स्वतःला सिद्ध करता येत.यात माझ्या शाळेतील मुलांना "खेलो इंडिया" या सारख्या स्पर्धेत निवड चाचणीत यश सुध्दा मिळाले तर बरीच मुले मुली राज्यस्तर शॉटपुट,धावणे उंच उडी या स्पर्धेत झेप घेतली आहे.
शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात त्यामुळे या शाळेची ओळख सुध्दा राज्य नव्हे तर देश विदेशात झाली आहे.आज या शाळेतील मुलांसाठी ऑस्ट्रेलियातून मदत होते. सौ. रत्ना पाटील (सिडनी) यांनी सन २०२४ -२०२५ करिता एक नाविन्यपूर्ण उपक्रमाची घोषण केली होती.शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थिनी करिता "सावित्री फुले पुरस्कार" व मुलानं करिता "महात्मा फुले पुरस्कार" या पुरस्काराला रक्कम ५,००० हजार रुपये रक्कम नगद देण्याचे घोषित केले.
मी गेली १८ वर्षापासून एकाच शाळेत काम करीत आहे .आज या शाळेची ओळख ३६५दिवस चालणारी शाळा म्हणून ओळखली जाते. १२ऑगस्ट २००६ ला माझी प्रथम नियुक्ती झाली.तेव्हा या शाळेत इयत्ता १ली ते इयत्ता ४थी पर्यंत शाळा होती . त्या वेळी शाळेचा पट २२ होता. आज या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी ची मान्यता मिळाली आहे. तर शालेय पट २००पर्यंत पोहचला आहे. गावाची एकूण लोखसंख्या ४००, घर १२० असून या शाळेत बाहेर गावातील मुले १३० च्या वर आहेत, म्हणून म्हणतात न ...
" तुम्ही कुठे काम करता याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही कसं काम करता याला महत्व आहे."
राजेंद्र उदेभान परतेकी(विषय शिक्षक)
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पालडोह
पं.स.जिवती जिल्हा चंद्रपूर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
राज्यपुरस्कार प्राप्त सन २०२१-२०२२
आपल्या प्रतिक्रिया द्या....