चंद्रपूर :--
भारतीय कम्युनिस्ट पार्टी चंद्रपुर जिल्ह्याचे त्रैवाषिकअधिवेशन दिनांक 21 आॅगस्ट 2022 ला स्थानिक नागाचारी महाराज सभागृहातआदिलोक काॅ डॉ महेश कोपुलवार सदस्य राज्य कार्यकारणी महाराष्ट्र यांच्या अध्यक्ष ते खाली घेणयात आले काॅ श्यामजी काळे राज्य सचिव मंडळ सदक्ष भाकप नागपूर याणी अधिवेशन चे रितशिर उद्घाटन केले। प्रथम पक्षाचा लाल ध्वज वरिष्ठ काॅ डॉ रेड्डी यांच्या हस्ते फडकविण्यात आले.
काॅ प्रा नामदेव कंनाके जिल्हा सचिव यानी पार्टी चे तिन वर्षाचे वाषीक अहवाल सादर केले ।या वर पक्ष प्रतिनिधि कॉ विनोद झोडगे, कॉ दिलीप बर्गी,कॉ प्रदीप चिताडे,कॉ मीना चौधरी,कॉ प्रकाश रेड्डी व कॉ रवींद्र उमाटे,राजू गईनवार,कॉ विश्वनाथ बुरांडे नी अहवालावर चचॉ केले।
काॅ शयामजी काळे राज्य सचिव मंडळ सदक्ष यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या जनविरोधी धोरणा च्या भूमिकेवर सडकून टीका करत या भांडवलदारी व धर्मांध सरकार ला सत्तेपासून खाली खिचण्यासाठी गावागावात पक्ष शाखा निर्माण करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मजबूत करण्याचे आवाहन केले.
काॅ डॉ महेश कोपुलवार यांनी 18 ते 20 सप्टेंबर 2022 रोजी भाकप चे राज्य अधिवेशन अमरावती येथे होत असल्याची ची माहीती देऊन ,पक्ष्याच्या 98 वर्ष्याच्या त्याग,संघर्षाची भूमिका विशद करत धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी पार्टीला मजबूत करण्याचे सांगितले.
पुढील काळात जिल्ह्यातील 15 ही तालुक्यात पक्षाच्या शाखा निर्माण करून ,पार्टीला मजबूत करण्यासाठी कॉ प्रा नामदेव कंनाके, कॉ विनोद झोडगे,कॉ राजू गईनवार,कॉ प्रकाश रेड्डी,रवींद्र उमाटे, कॉ श्रीधर वाढई, कॉ कॅप्टन,कॉ ललिता कोवे व कॉ डॉ रेड्डी यांना जबाबदारी देऊन,अमरावती येथे होणाऱ्या राज्य अधिवेशन करिता 11 प्रतिनिधी ची निवड करण्यात आली आहे.
अधिवेशनाचे संचालन कॉ रवींद्र उमाटे तर आभार कॉ राजू गईनवार यांनी मानले.
दि 23 आगस्ट 2022
आपला
कॉ प्रा. नामदेव कंनाके जिल्हा सचिव
भारतीय कम्युनिस्ट पक्ष चंद्रपुर
आपल्या प्रतिक्रिया द्या....