थैलीसेमिया सारख्या दुर्धर आजारावर उपचार व आटोक्यात आणण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली तयार करण्यात यावी आमदार रणधीर सावरकरांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात उपस्थित करून उपाययोजनेवर चर्चा घडवून आणली, महाराष्ट्र थैलीसेमिया मुक्त करण्याच्या दिशेने आरोग्य विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून या अंतर्गत लवकरच एक मानक कार्यप्रणाली एसओपी तयार करावी, महाराष्ट्रातील या गंभीर अनुवंशिक आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भावी पिढ्यांना त्यापासून वाचवण्यासाठी एक ठोस उपक्रम राबवायला हवा, तसेच आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात सुमारे १२००० रुग्ण असून या योजनेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णांना चांगले उपचार मिळतील शिवाय नवीन पिढीला या आजारापासून वाचवण्यासाठी मदत होणार आहे, थेंलीसेमियाचे निदान व्यवस्थापन आणि समुपदेशन यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत का? त्याअनुषंगाने शासनाने याची अंमलबजावणी केली आहे काय असे अनेक प्रश्न आमदार रणधीर सावरकरांनी आपल्या प्रश्नाद्वारे उपस्थित केले होते,
सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नाचे लेखी उत्तरात स्पष्ट केले की,
थँलेसेमिया प्रतिबंध व वेळेवर निदान होण्यासाठी खासगी रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये अनिवार्य चाचण्या आणि उपचारांसाठी मदत म्हणून मार्गदर्शक तत्वे यांचा या कार्यप्रणाली मध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. परंतू थैलेसेमियाच्या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा शासकीय रुग्णालयात थैलेसेमिया रुग्णांची प्राधान्याने तपासणी आवश्यकता विचारात घेऊन एमआरआय स्कॅन, सोनोग्राफी, २ डी इको, नियमित रक्त तपासणी चाचणी, सीबीसी, एलएफटी, केएफटी, सिरम फेरिटिन, टीएफटी तपासण्या करण्यात येतात. थेंलेसेमिया आजाराचे निश्चित निदान हे एचपीएलसी तपासणी द्वारे करण्यात येते व ही तपासणी सर्व आरोग्य संस्थामध्ये मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. थैलेसेमियाच्या रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत रक्त संक्रमण करण्यात येते. शरीरातील लोह कमी करण्यासाठीच्या Iron chelation च्या गोळया देण्यात येतात. सदर कार्यप्रणाली तयार करण्यात आलेली असून त्याअंतर्गत राज्य आरोग्य संस्था नागपूर येथे प्रशिक्षण घेण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. तेथे प्रशिक्षकांमार्फत जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण/कार्यशाळा घेण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविण्यात आलेले असून समुपदेशकांना थैलेसेमिया आजारासंदर्भात राज्य आरोग्य संस्था, नागपूर मार्फत प्रशिक्षण घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य आरोग्य संस्था PHIनागपूर यांचेकडून सद्यस्थितीत ARSH, Sickle Cell, RBSK व ICTC या योजनांतर्गत कार्यरत असलेल्या ३४ जिल्ह्यांमधील १०० समुपदेशकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे.