कारंजा (लाड): सद्यस्थितीत दिव्यांगाचे कैवारी आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चुभाऊ कडू यांनी जनतेच्या वचनपूर्तीसाठी शासनासोबत संघर्षाची भूमीका घेऊन फार मोठे आंदोलन उभारले असून सध्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन देण्यासाठी बच्चुभाऊ कडू आग्रही असून महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहेत. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे वारे वहात असतांना बच्चुभाऊंना लाखो शेतकरी,दिव्यांग जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे शासनकर्त्यांना कमालीची धडकी भरली आहे. कधी नव्हे एवढे शेतकरी व दिव्यांग दररोज आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यामुळे अखेर महाराष्ट्र शासनाकडून संबंधीत मंत्र्यांनी दिव्यांगाच्या संगायो अनुदानात दरमहा एक हजार रुपयाची वाढ केली आहे. सहा हजार रुपये मानधनाची मागणी असतांना एक हजार रुपयाची अल्पशी वाढ करून एकूण मानधन अडीच हजार रुपये करण्यात आले . याचे सर्वस्वी श्रेय बच्चुभाऊ कडू यांना आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी, महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांचे नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच दिव्यांगाचे एकमेव कैवारी बच्चुभाऊ कडू यांचे ऋण व्यक्त करीत त्यांचे आभार मानले आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, जिल्हाध्यक्ष ब्रम्हा पाटील बांडे, तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा सुश्री चित्राताई वाकोडे, प्रदिप वानखडे , कार्याध्यक्ष धनराज महाराज जाधव, सचिव इंद्रजीत देवरामकर, कारंजा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील ठाकरे, उपाध्यक्ष गजानन काकड, तालुका महिला आघाडी अध्यक्ष वंदना राठोड, कार्याध्यक्ष सुमित्रा हटकर,कारंजा शहराध्यक्ष रमेश सोनवणे,कार्याध्यक्ष नंदू फुलारी, महिला आघाडी अध्यक्ष साधना सोळंके,कार्याध्यक्ष सुनीता फुलारी ऐतनगरकर, उपाध्यक्ष अमिना प्यारेवाले, सचिव रेणुका जाधव, अजाबराव ढळे, कु . ज्योती इंगोले, कांताबाई लोखंडे तालुक्यातील सर्व सर्कल अध्यक्ष तसेच बहुसंख्या दिव्यांग बांधव हजर होते.यावेळी सुरज राठोड, जीवन राठोड हसन चौधरी यांनी अधिक अधिक अधिक मेहनत घेऊन आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना पेढे वाटले असे वृत्त जिल्हाध्यक्ष ब्रम्हा पाटील बांडे यांनी कळवीले आहे.