कारंजा : विश्वरत्न महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवानिमित्त कारंजा येथील सर्वच वार्ड,मोहल्ले,नगरांमधून भिमरायांच्या जन्मोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करण्याकरीता दि १४ एप्रिलच्या पूर्वसंध्येलाच उत्तररात्री १२:०० नंतर फटाक्यांची अभूतपूर्व आतिषबाजी करण्यात येऊन, आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी कारंजा नगरी निळ्या रोषनाईने न्हावून निघालेली दिसत होती. बुद्धविहारांमध्ये व घरोघरी रोषनाई करण्यात आलेला होती.
दि.१४ एप्रिलच्या प्रातःकाळीच शहरातील सर्वच बुद्धविहारांमध्ये आणि घरोघरी मंगलमय वातावरण होते.महामानवाच्या पुतळ्याला हारार्पण करून,मेणबत्ती लावून, त्यांना पवित्र अभिवादन करण्यात येत होते.तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील भिमअनुयायी,सर्वच राजकिय पक्षाचे,सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी,लोकसेवक,पत्रकार मंडळी,डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला हरार्पण व वंदना करीत होते.त्यानंतर नऊ वाजता शहरातील प्रमुख मार्गाने,लाखोच्या संख्येने भिमसैनिक व भिम अनुयायी भारतरत्न डॉ.आंबेडकरांना मानवंदना करण्याकरीता मिरवणूकीमध्ये सहभागी झाले होते.

याप्रसंगीपंचशिलनगर,राहूलनगर,सिद्धार्थनगर, भिमनगर,अशोकनगर,सिध्दार्थ नगर,महात्मा फुले नगर, गौतमनगर,शांतीनगर,बायपास आदी भागामधून विविध मंडळे, संस्था व भिमअनुयायी सहभागी झालेत.मिरवणुकीमध्ये विविध मंडळाची महिला पुरुषांची लेझिम पथके व आबाल वृद्धांचा उत्साह ओसंडून वाहात होता.मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची,लिंबू शरबत, अल्पोपहाराची व भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून येत होते.सायंकाळ पर्यंत मिरवणूक सुरू होती.रखरखत्या उन्हातही लाखोचा भिमसागर अभूतपूर्व दिसत होता.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....