कारंजा (लाड) : श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचे सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. श्री.विनायक महाराज गुंजाटे रा. पिंपळगाव (गुंजाटे) ता.कारंजा यांच्या द्वितीय मुलीचा चि.सौ.का.श्रुतिका हिचा विवाह सोहळा,श्री.रामेश्वरजी गावंडे रा.लिंगी (सायखेडा) ता.आर्णी जि.यवतमाळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव धिरज यांचेशी दि.०२ जून २०२५ रोजी,शेतकरी निवास कारंजा येथे,वारकरी संप्रदायाप्रमाणे संपन्न झाला. त्यानिमित्ताने वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी नातलग व सगेसोयऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.त्यामध्ये प्रामुख्याने समाजमन जपणारे,वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री.संजयभाऊ देशमुख हे दिल्ली येथे जात असतांना वेळात वेळ काढून स्वतः जातीने हजर राहीले.त्याच प्रमाणे वधूपिता ह.भ.प.विनायक महाराज गुंजाटे यांचे परममित्र म्हणून ओळखले जाणारे,माजी राज्यमंत्री तथा कारंजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मा.श्री. गुलाबरावभाऊ गावंडे हे देखील या लग्नसोहळ्याच्या शुभप्रसंगी उपस्थित होते.यावेळी त्यांनी वधूवरास शुभाशिर्वाद दिले.आणि समाज बांधवांशी सुसंवाद साधला.त्याप्रसंगी आलेल्या अतिथींचे खासदार मा.श्री.संजयभाऊ देशमुख आणि माजी राज्यमंत्री मा.श्री. गुलाबरावजी गावंडे यांचे स्वतः हभप.विनायक महाराज गुंजाटे यांनी सहर्ष स्वागत केले. याप्रसंगी ह.भ.प.विनायक महाराज गुंजाटे, अ.भा.मराठी नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर,ज्येष्ठ पत्रकार तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे इत्यादी उपस्थित होते.यावेळी संजय कडोळे यांनी मा.श्री.गुलाबराव भाऊ गावंडे यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, "भाऊ तुम्ही आजही तेजस्वी आणि ठणठणीत दिसता." याचे रहस्य विचारले असता,मा. श्री.गुलाबरावभाऊंनी "मी दररोज माझ्या भोजनात एकच चपाती घेतो."असे उत्तर देऊन आपल्या सात्विक आहारावर हास्य केले. त्यानंतर बराच वेळपर्यंत खासदार मा.श्री.संजयभाऊ देशमुख यांचेशी त्यांनी आपसात हितगुज केले. त्यावर शिवसेनेच्या आजीमाजी नेत्यांचे हे मनोमिलन असल्याचे संजय कडोळे यांनी म्हटले.