कारंजा (लाड) : स्थानिक प्राशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था कारंजाचा बँकींग क्षेत्रामध्ये सर्वत्र नावलौकीक असून,आपल्या प्रामाणिक, पारदर्शी व विश्वासार्ह कारभारासाठी ही संस्था ओळखल्या जात असून, प्रशिक पतसंस्था वेळोवेळी ग्राहकराजा म्हणजे ग्रामस्थ,शेतकरी हिताचे निर्णय घेणारी एकमेव संस्था म्हणूनही कार्य करत आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यात ह्या पतसंस्थेचा खूप मोठा ग्राहक वर्ग तयार झाला आहे. अशा या पतसंस्थेतील सर्व ग्राहक ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षीत आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही खोट्या अपप्रचाराला किंवा अफवांना बळी पडता पतसंस्थेवर १००% विश्वास ठेवून सहकार्य करण्याचे करण्याचे आवाहन नवनिर्वाचित संचालक आकाश भाऊ कऱ्हे यांनी खातेदारांना केले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, प्रशिक पतसंस्थेच्या प्रामाणिक, शिस्तप्रिय व आपल्या कर्तव्यात कसूर न करणाऱ्या, व्यवस्थापिका आशाताई राऊत यांच्या वर्षानुवर्षे व्यवहारच नसलेल्या आणि बंद पडलेल्या, एस. बँकेच्या खात्यात पश्चिम बंगाल मधून अज्ञात व्यक्तीने परस्पर ४१ लाख २२ हजार रुपये रक्कम जमा केली. व त्यापैकी परस्पर १७ लाख रु रक्कम काढली सुद्धा.मात्र ह्या व्यवहाराची कोणतीच माहिती व्यवस्थापिका आशाताई राऊत यांना नव्हती. यामधील सत्यता पडताळून पाहिली तर आपणास ठळकपणे दिसून येते की,सदर प्रकरण व्यवस्थापिका आशाताई राऊत यांच्या वैयक्तिक खात्याशी संबंधित असून,व्यवहार त्यांच्या बंद पडलेल्या खात्यात घडल्यामुळे पश्चिम बंगाल मधील व्यक्तीच्या स्वतःच्या चुकीने घडला असल्याचे ठळकपणे जाणवत आहे. त्यामुळे प्रशिक पतसंस्थेच्या ग्राहक, खातेदार, ठेवीदार यांनी ह्या प्रकरणाने खचून न जाता, ताणतणाव घेऊ नये.व या प्रकरणाने उठणाऱ्या खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता पतसंस्थेप्रति जागरूक राहून संस्थेला पूर्वीसारखेच सहकार्य करावे.आपल्या सर्व ठेवीदाराच्या ठेवी ह्या प्रशिक पतसंस्था जबाबदारीने सांभाळीत असून त्या सुरक्षित आहेत.आपल्याला गरज भासेल त्या त्या वेळी काढता देखील येतील. आजपर्यत आपण पतसंस्थेला वेळोवेळी विश्वासाने सहकार्य केले असून यापुढेही धादांत खोट्या अपप्रचाराला किंवा कोणत्याही अफवांना बळी न पडता ( तसेच आपण न डगमगता) संचालक मंडळ आणि पतसंस्थेवर आपला विश्वास कायम ठेवून संस्थेचा नावलौकीक वाढवावा.असे आवाहन प्रशिक पतसंस्थेचे संचालक ॲड.रवि रामटेके, आकाश कऱ्हे,आशिष बंड, गुलाबराव साटोटे,पांडूरंग भगत, कृष्णराव राऊत,ओंकार पाढेन, प्रशांत काळे,मेघन जुमळे व डॉ. अनघा उकर्डे यांनी केले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे