तालुक्यातील रूई येथे जिल्हा परिषद महीला व बालकल्याण विभागाच्या निधीतून ८ लाख रुपये किंमतीच्या नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून इमारतीचे काम पुर्णत्वास आले आहे.
सदर अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
रूई येथील अंगणवाडी क्र. १ ची इमारत जिर्ण झाल्याने नवीन इमारतीच्या बांधकामाचा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला होता.
सदर नवीन अंगणवाडी इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अण्णाजी ठाकरे बाबुसाहेब, उपसंरपंच ज्ञानेश्वर बुल्ले, ग्रामसेवक रंजीत नंदेश्वर, ग्रा.पं.सदस्य उत्तम बनकर, ग्रा.पं. सदस्य मनोहर भर्रे, ग्रा.पं. सदस्या संगिताताई नाकतोडे, ग्रा.पं. सदस्या कविताताई बगमारे, अंगणवाडी सेविका माधुरी बनकर, सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल बनकर रोजगार सेवक रामचंद्र ठेंगरी, ग्रा.पं.शिपाई अजय शिवुरकार, पत्रकार राहुल मैंद, अशोक लोखंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.