कारंजा (लाड) : कारंजा येथील रहिवाशी गोंधळी लोककलावंत आणि सद्यस्थितीत पातूर (अकोला) न्यायालयात कार्यरत न्यायालयीन कर्मचारी स्व.उमेश मधुकरराव कडोळ यांचे नुकतेच निधन झाले.त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने, त्यांना दि १३ जुलै रोजी श्रध्दांजली वाहण्यात आली. याबद्दल अधिक वृत्त असे की, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त झुंजार पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांचे कनिष्ठ बंधू स्व.उमेश मधुकरराव कडोळे हे शांत,सुस्वभावी,हास्यमुख,प्रामाणिक व हजरजवाबी न्यायालयीन कर्मचारी म्हणून ओळखले जात होते.त्यांनी इ. सन १९९९ पासून जिल्हा सत्र न्यायालया अंतर्गत वाशिम,कारंजा,अकोला, कारंजा,मुर्तिजापूर, पातुर,अकोला,पातुर इत्यादी न्यायालयात "कनिष्ठ लिपीक" ते "वरिष्ठ लिपीक" व पुढे उच्चश्रेणी पदावर सलग २५ वर्ष स्वच्छ सेवा दिल्यानंतर अचानक उद्भवलेल्या दुर्धर आजाराने स्व. उमेश मधुकरराव कडोळे यांचे दि. १९ जून २०२५ रोजी निधन झाले.त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मुळ गावी कारंजा शहरात सर्वत्र शोककळा पसरून हळहळ व्यक्त होत असतांनाच, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कारंजा कार्यालयात जुलै महिन्याच्या मासिक सभेमध्ये त्यांना सामुहिक श्रद्धांजली देण्यात आली.तसेच त्यांचे पश्चात त्यांचे वयोवृद्ध आई दुर्गाबाई आणि मोठे भाऊ संजय कडोळे यांच्या दुःखात सहभागी होत असल्याचे पत्रकारांनी सांगीतले.यावेळी अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी,वाशिम जिल्हाध्यक्ष किरण क्षार,उपाध्यक्ष प्रा.सी.पी. शेकूवाले सर,तालुकाध्यक्ष मोहम्मद मुन्निवाले,शहर अध्यक्ष नितीन वाणी,युवा पत्रकार समिर देशपांडे,अमोल अघम,एकनाथ पवार,विजय गागरे,गोपाल पाटील कडू इत्यादी पदाधिकारी तथा नामांकित वृत्तपत्राची पत्रकार मंडळी उपस्थित होती.