कारंजा-येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येेथिल बाबासाहेब धाबेकर विद्यालयात शनिवार दिनांक 13 जुलै रोजी "वृक्षदिंडी व वृक्षारोपन" मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात आयोजित करन्यात आले होते.
दि.13 जुलै रोजी सकाळी संपूर्ण गावातुन वृक्षदिंडी काढण्यात आली, त्यामध्ये वृक्ष संवर्धनासाठी विविध नारे लावुन वृक्षारोपना करिता वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर शालेय परिसरात गावाच्या सरपंच्या विद्याताई आमले, उपसरपंच सावित्रीताई मड़के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड,तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा विद्याताई परमेश्वर आमले, उपसरपंच सावित्रीताई मड़के, ग्रा.प सदस्य तूफान बोनके,परमेश्वर आमले,विवेक पोहेकर, संस्थेचे संचालक देविदास काळबांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोपाल काकड यांनी आपल्या प्रास्तविकात वृक्षारोपनाचे महत्व विशद केले.
अध्यक्षिय भाषणात मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष आणि मानव यांच्या संबंधांचे महत्व पटवून दिले.वृक्ष लागवडीचे विविध फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्म. विद्यार्थी उपस्थित होते.