ठाणे.... नौपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने दि.२७ ऑगस्ट रोजी विद्या प्रसारक मंडळ ठाणे लॉ कॉलेजच्या कायदे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता सेमिनार आयोजित करुण संपन्न.
सदर सेमिनार मध्ये पोलीस प्रशासन कार्यपद्धती व दैनंदिन जीवनातील पोलीस व वकिल यांची भूमिका** ह्या विषयावर ठवरिष्ठ ठाणेदार संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी १२:०० वा. पासून ते १५:३० वा. पर्यत सविस्तर मार्गदर्शन व सुसंवाद करण्यात आला.
सदर सेमिनारकरीता निवृत्त पोलीस उपआयुक्त नागेश लोहार व ठाणे लॉ कॉलेजचे प्राचार्य वाघ सर आदी उपस्थित होते. सदर सेमिनारास ठाणे लॉ कॉलेजचे ४० विद्यार्थी उपस्थित होते.